बॉलिवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णीला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी केनियन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिचा नवरा विजय गोस्वामी उर्फ विकी गोस्वामीलादेखील पोलिसांनी अटक घेतल्याचे वृत्त आहे. पोलीस दोघांची कसून चौकशी करत असल्याचे समजते. विकी गोस्वामी अमली पदार्थांची तस्करी करीत असून, याआधीदेखील त्याला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी दुबईमध्ये अटक करण्यात आली होती. करण अर्जुन, क्रांतीवीर, बाजी, आशिक आवारा यासारख्या चित्रपटांमधून अभिनय केलेल्या ममताने बॉलिवूडमध्ये चांगला जम बसविला होता. परंतु, अचानकपणे ती बॉलिवूडपासून दूरावली. एका मासिकाच्या कव्हरपेजवरील तिच्या टॉपलेस फोटोने खळबळ उडवून दिली होती.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2014 रोजी प्रकाशित
अभिनेत्री ममता कुलकर्णी केनियन पोलिसांच्या ताब्यात
बॉलिवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णीला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी केनियन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिचा नवरा विजय गोस्वामी...
First published on: 13-11-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamta kulkarni husband vicky goswami arrested in kenya for drug trafficking in kenya