छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेकडे पाहिले जाते. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी वाईट बातमी आहे. येत्या काही दिवसात ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण करण्यात आले.

या मालिकेत सध्या दीपू आणि इंद्राच्या लग्नाचा सिक्वेन्स शूट करण्यात येत आहे. या लग्नाच्या सिक्वेन्सनंतर ही मालिका ऑफ एअर केली जाणार आहे. सध्या या मालिकेत इंद्रा हा पुन्हा त्याच्या घरी राहायला गेला आहे, असे दाखवण्यात आले आहे. तर दुसरीकडे दीपूच्या बाबांनी इंद्राला एक संधी दिली असून तो त्याची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे हे सर्व सुरु असताना दुसरीकडे कार्तिक आणि सानिका इंद्राला आणखी गोत्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व संकटावर मात करुन इंद्रा आणि दीपूचं लग्न होणार असं मालिकेच्या ट्रॅकवरुन पाहायला मिळत आहे.

“मी मालिका सोडलेली नाही…”, ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडण्यावर हृता दुर्गुळेचे स्पष्टीकरण

या मालिकेच्या जागी आता नवी मालिका प्रसारित होणार आहे. ‘तू चाल पुढं’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे. ही नवीन मालिका येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा टीआरपी हा घसरत चालला होता.

पाहा व्हिडीओ –

त्यामुळे आता ‘तू चाल पुढं’ ही मालिका ‘मन उडू उडू झालं’ मालिकेची जागा घेणार आहे. त्यामुळे मन उडू उडू झालं ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे.

“माझा या मालिकेतील सहभाग संपला”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून ३ कलाकारांची एक्झिट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तू चाल पुढं’ ही मालिका एका गृहिणीची आहे जिची खूप मोठी स्वप्न मोठी आहेत. ही स्वप्न पूर्ण करत असताना येणारे अडथळे पार करत तिला पुढे जायचं आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना घर-संसारात रमलेल्या एका गृहिणीची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेकांनी या मालिकेची तुलना ‘आई कुठे काय करते’ मालिकेशी केली आहे. या मालिकेच्या निमित्तानं अभिनेत्री दीपा परब मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे.