OTT Release This Week : गेल्या आठवड्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक मनोरंजक चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाल्या. थिएटरमध्येही खूप गर्दी होती.

या आठवड्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ इत्यादी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक उत्तम चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. चला जाणून घेऊया या आठवड्यातील ओटीटीवर कोणते चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.

मंडला मर्डर्स

नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्सच्या भागीदारीत बनलेली ‘मंडला मर्डर्स’ ही वेब सीरिज या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाणी कपूर, सुरवीन चावला, श्रिया पिळगावकर आणि रघुवीर यादव यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही सीरिज चरणदासपूरच्या प्राचीन उपकरणाचे रहस्य उलगडणार आहे. या सीरिजमध्ये वाणी इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर रिया थॉमसच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सीरिज २५ जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.

सरजमीन

काजोल, इब्राहिम अली खान, पृथ्वीराज सुकुमारन व मिहिर आहुजा अभिनीत ‘सरजमीन’ हा चित्रपटदेखील या आठवड्याच्या यादीत आहे. तो २५ जुलैपासून जिओ हॉटस्टारवर तो प्रदर्शित होईल. या चित्रपटाची कथा एका लष्करी अधिकाऱ्याची आहे, जो काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे. काजोलने या चित्रपटात इब्राहिमच्या आईची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट कयोज इराणी यांनी दिग्दर्शित केला आहे.

रंगीन

या शोमध्ये विनीत कुमार सिंग, राजश्री देशपांडे, तारुक रैना व शीबा चड्ढा हे कलाकार दिसणार आहेत. त्याची कथा एका पुरुषावर आधारित आहे, ज्याचा त्याच्या पत्नीकडून विश्वासघात होतो आणि तो त्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी एक मोठे पाऊल उचलतो. २५ जुलैपासून तुम्हाला प्राइम व्हिडीओवर ‘रंगीन’ हा शो पाहता येईल.

सौंकन सौंकने 2

निमरत खैरा, सरगुन मेहता, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग व एमी विर्क अभिनीत हा रोमँटिक चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २५ जुलैपासून प्रदर्शित होईल. त्याची कथा एका पतीची आहे, ज्याला दोन बायका आहेत. त्याची आई तिच्या मुलासाठी दुसरी बायको आणते.

अ‍ॅक्शन थ्रिलरने भरलेली ‘ट्रिगर’ ही ड्रामा सीरिज २५ जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. त्यात किम नाम गिल आणि किम यंग क्वांग हे मुख्य भूमिकांत आहेत. त्याशिवाय अमेरिकन स्पोर्टस् कॉमेडी चित्रपट ‘हॅपी गिलमोर २’देखील या यादीत आहे, जो २५ जुलैपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. अमेरिकन हॉरर चित्रपट ‘अंटिल डॉन’ २५ जुलैपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.