बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मंदिरा बेदी गेल्या काही महिन्यापासून अत्यंत अवघड परिस्थितीतून जातेय. दीड महिन्यापूर्वी तिने पती राज कौशल यांना गमावलंय. पती राज कौशल यांच्या निधनानंतर मंदिरा बेदी मनाने पूर्णपणे तुटून गेली होती. पण कसं बसं स्वतःला सावरत ती या दुःखातून बाहेर येण्याचा प्रयत्न करताना दिसून येतेय. अद्याप ती पती राज कौशल यांना विसरू शकलेली नाही. पती राज कौशल यांच्या वाढदिवशी मंदिरा बेदी भावूक झाली. दिवंगत पतीच्या वाढदिवशी तिने एक इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री मंदिरा बेदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती राज कौशल यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये दोघेही काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसून येत आहेत आहे. या फोटोमध्ये दोघांच्या ही चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे झळकताना दिसतोय. हा फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात तिने लिहिलंय, “१५ ऑगस्ट…आमच्यासाठी हा कायम सेलिब्रेशनचा दिवस होता…स्वातंत्र्यदिन आणि सोबत राजचा वाढदिवस…वाढदिवसाच्या शुभेच्छा राजी…आशा करते की तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तूम्ही कायम आम्हाला पाहत असाल आणि कायम आमच्या पाठिशी असाल जसं आतापर्यंत आमच्या पाठीशी राहिलात. जी आपल्या दोघांमध्ये पोकळी निर्माण झालीय ती कधीच भरून न निघणारी आहे. मी आशा करते तुम्ही शांतीपूर्ण आणि सुखदायी ठिकाणी असाल.”
View this post on Instagram
मित्र-मैत्रीणींनी वाढवली स्फूर्ती
मंदीरा बेदीने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या मित्र-मैत्रीणींनी कमेंट्स करण्यात सुरूवात केली. मौनी रॉय, गुल पनाग, हंसिका मोटवानी आणि मानसी स्कॉट सह अनेक कलाकारांनी कमेंट करत तिची स्फूर्ती वाढवली. काही दिवसांपूर्वीच राज कौशल यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंदिराने घरात एक पूजा ठेवली होती. यावेळी ती आपल्या मुला-मुलींसोबत दिसून आली. याशिवाय तिने एक फोटो शेअर करत आयुष्याला पुन्हा नव्याने सुरूवात करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तिने पुन्हा आपल्या कामाल सुरूवात केली.
मंदिरा-राजने ताराला घेतलं दत्तक
राज कौशल यांचं ३० जून २०२१ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण बॉलिवूड क्षेत्राला धक्का बसला होता. मंदिरा आणि राजने गेल्याच वर्षी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. मुलीचं नाव तारा असं ठेवलं. सोबत मंदिरा आणि राजना एक मुलगा देखील आहे. त्याचं नाव वीर असं आहे.