धर्मवीर या मराठी चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा आज सायन-पनवेल महामार्गावर कोकण भवन येथे अपघात झाला. मंगेश देसाई आपल्या कुटुंबियांसोबत कर्जतला जात होते. समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने या अपघातात मंगेश देसाई व त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नसून कारचे मात्र मोठं नुकसान झाले आहे.

हेही वाचा >>> “अजून खूप काही सांगायचे बाकी, वेळ आणली तर…” विधिमंडळातील भाषणाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिला इशारा

मिळालेल्या माहितीनुसार धर्मवीर चित्रपटाचे निर्मार्ते तसेच अभिनेते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात झाला आहे. ते आपल्या कुटुंबियांसोबत कर्जलतला जात होते. यावेळी समोरच्या कारने अचानक ब्रेक मारल्यामुळे देसाई यांची कार त्या कारवर धडकली. यामध्ये देसाई तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही दुखपात झाली नसून ते सर्व सुखरुप आहेत. तशी माहिती खुद्द मंगेश देसाई यांनी दिली आहे. सायन-पनवेल महामार्गावर हा अपघात झाला.

हेही वाचा >>> “आपल्याच माणसांनी आमच्यावर वार केले,” एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खदखद, रोख नेमका कोणावर?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुमच्या सर्वांच्या सदिच्छा असताना, गणपती बाप्पा माझ्यासोबत असताना मला काहीही होऊ शकत नाही. मी सुखरुप आहे. छोटासा अपघात झाला होता. गाडी थोडी खराब झाली. मला तसेच माझ्या कुटुंबियांना काहीही दुखापत झालेली नाही. मला भरपूर फोन कॉल्स आले. काळजी करण्यासारखे काही नाही,” अशी माहिती देसाई यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.