गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ उलथापालथ झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र गुरुवारी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला. यानंतर सर्वच स्तरातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय, सामाजिक आणि सर्व सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. आता धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी शुभेच्छा दिल्यानंतर आणखी एक पोस्ट केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

मंगेश देसाई यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत, “आपली पहिली भेट मला आठवते साहेब. २००७ साली तुम्ही जेव्हा आमदार होता तेव्हा आपण वागळे इस्टेटमध्ये एका कार्यक्रमात भेटलो होतो. तुम्हाला पहिल्यांदा तेव्हाच भेटलो होतो. तसं तुम्हाला बघून घाबरलो होतो. पण तुम्ही खूप छान बोललात. सचिन जोशीला मला तुमचं व्हिसीटींग कार्ड द्यायला लावलत आणि ‘काहीही मदत लागली तर सांगा’ असं आवर्जून म्हणालात. माझ्या सारख्या सामान्य कलाकाराला मदत लागणारच. तीही तुम्ही एका मिनटात केलीत आणि त्या मदतीचे आभार म्हणून मी तुम्हाला तुमचंच एक भित्तीचित्र भेट म्हणून द्यायला आलो होतो, तेव्हाचे तुमचे शब्द मला आठवतात हे कशाला? आपण मित्र आहोत मंगेश आणि खरंच मित्र झालात”, असे मंगेश म्हणाला.

आणखी वाचा : “२०० बिहारी इथे उभे करीन…”, घरातल्याच कूकने पोटात चाकू खुपसण्याची अभिनेत्रीला दिली धमकी

पाहा पोस्ट

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

पुढे मंगेश म्हणाला, “अजून एक प्रसंग आठवतो. सगळे तुम्हाला नमस्कार करायचे, मी पण एकदा केला. तेव्हा हे करत जाऊ नका. आपण मित्र आहोत, असंच म्हणालात आणि खरंच मित्र झालात त्यानंतर जसजसे वर्ष गेले तसे प्रत्येक प्रसंगात मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिलात, त्या बद्दल हृदयपूर्वक आभार साहेब. माझी २०१३ पासून मनात असलेली” दिघे “साहेबांवरच्या चरितपटाची मनोकामना पूर्ण करून माझी निर्माता म्हणून ओळख घडवलीत. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळ केलंत त्या बद्दल मानावे तेवढे आभार कमीच आहेत.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवनप्रवासाचा व्हिडीओ

आणखी वाचा : “टरबूज हे आरोग्यासाठी चांगले… पण शिंदे”; ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हरेच्या ‘या’ पोस्टपेक्षा नेटकऱ्यांच्या कमेंट चर्चेत

पुढे मंगेश म्हणाला, “आज तुम्ही महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री झालात. प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा, माणसाशी माणुसकीने वागणारा, विरोधकांना नामवणारा आणि क्षमा करणारा अहोरात्र काम करणारा मी जवळून पाहिलेला एक समाजकारणी मुख्यमंत्री झाला याचा खूप अभिमान वाटतो. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, महाराष्ट्र घडवण्यात तुमचा मोलाचा वाट राहो हीच दत्त गुरूंकडे प्रार्थना. जय हिंद!जय महाराष्ट्र!”