अभिनेता सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांसोबतच बिहार पोलीस देखील करत आहेत. मात्र बिहार पोलिसांचं या प्रकरणात उडी घेणं मुंबई पोलिसांना बिलकूल आवडलेलं नाही. ते कुठल्याही प्रकारे बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संगीतकार मनोज मुंतशीर याने मुंबई पोलिसांवर टीका केली आहे. तो बिहार पोलिसांना मुंबईत राहण्यासाठी स्वत:चं ऑफिस देखील द्यायला तयार आहे.
अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी होणार; केंद्रानं शिफारस स्वीकारली
ऐसी खबर है कि बिहार पुलिस को मुंबई में stay and movement के लिये कोई सहयोग नहीं मिल रहा. मैं अपना ऑफ़िस, जहां हर तरह की सुविधा है, ख़ाली करने को तय्यार हूँ. गाड़ी और ड्राइवर भी मैं दूँगा, बिहार पुलिस की जाँच रुकनी नहीं चाहिए. https://t.co/jR6mQYoLCN
— Manoj Muntashir (@manojmuntashir) August 5, 2020
अवश्य पाहा – राम मंदिर आणि भाजपाचा अजब योगायोग; शत्रुघ्न सिन्हा यांनी दाखवलं ते दुर्मिळ नाणं
“मुंबई पोलीस बिहार पोलिसांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही आहेत. त्यामुळे बिहार पोलिसांना राहण्यासाठी मी स्वत:चं ऑफिस द्यायला तयार आहे. जिथं सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तसंच चौकशीसाठी फिरणाऱ्या पोलिसांना स्वत:ची गाडी आणि ड्रायव्हर देखील देईन. कुठल्याही कारणामुळे बिहार पोलिसांची चौकशी थांबता नये.”अशा आशयाचं ट्विट मनोज मुंतशीर याने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे
१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
२. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.
४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.
५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.
६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
१०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.
