मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. नाटक, चित्रपट आणि मालिका यामुळे तो घराघरात पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून संकर्षण हा ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या निमित्ताने अमेरिकेत गेला होता. आता तब्बल दीड महिन्यांनी तो मुंबईत परतला आहे. यावेळी त्याने मुंबईतील एका प्रसिद्ध मराठमोळ्या पदार्थाची चव चाखली.

अमेरिकेत ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे प्रयोग १३ शहरांंमध्ये करण्यात आले. त्यानिमित्ताने तब्बल ३६ दिवसांपेक्षा जास्त वेळ संकर्षण हा अमेरिकेत होता. यानंतर आज मध्यरात्री संकर्षण हा भारतात परतला. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. तसेच त्याने एक स्टोरीही शेअर केली आहे.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

संकर्षणने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात भारताचा नकाशा पाहायला मिळत आहे. “Finally!! जवळपास दीड महिन्यांनी जेव्हा मुंबई, भारत”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.

Sankarshan Karhade
संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

त्याबरोबरच संकर्षणने इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे. “सुप्रभात, भारतात पोचलो. काल मध्यरात्री २.३० वा. मुंबईत पोचल्या पोचल्या प्रचंड भूक लागली हो.. मी काय खाललं बघा… तुम्ही खूप गॅप नंतर असे भारतात आलात तर काय खाल ..? तुम्हाला काय आवडेल..?” असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. यात संकर्षण हा वडापाव खाताना दिसत आहे. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आगामी नाटकांच्या प्रयोगाबद्दलचीही माहिती दिली आहे.

आणखी वाचा : “विशाखा नावाच्या मुली…”, चाहत्याच्या ‘त्या’ कमेंटवर विशाखा सुभेदार यांचे भन्नाट उत्तर, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान संकर्षण कऱ्हाडे हा सध्या तीन नाटकात व्यस्त आहे. ‘नियम व अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘संकर्षण Via स्पृहा’ अशी या तीन नाटकांची नाव आहेत. या सर्व नाटकात त्याच्या भूमिका प्रचंड गाजताना दिसत आहेत.