Video : “हा काय संतोष जुवेकर हाय…”; सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याने उडवली अभिनेत्याची खिल्ली

त्याची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Video : “हा काय संतोष जुवेकर हाय…”; सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याने उडवली अभिनेत्याची खिल्ली

मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली. संतोष जुवेकरचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतंच संतोष जुवेकरने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

संतोष जुवेकरने मालिका, चित्रपट, नाटक या सर्व प्लॅटफॉर्मवर आपली जादू दाखवली आहे. संतोष सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. तो अनेकदा त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयीची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सेल्फी घेण्यासाठी आलेला एक चाहता त्याची खिल्ली उडवताना दिसत आहे.

“आम्ही जरी एक परिवार असलो तरी…”, आनंद शिंदेंच्या नातवाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

संतोष जुवेकरने शेअर केलेल्या या व्हिडीओत तो ट्रेनमध्ये प्रवास करत असल्याचे दिसत आहे. यावेळी तो गॉगल घालून झोपला आहे. त्याचवेळी ट्रेनमधील एक प्रवासी त्याच्या बाजूने जातो. त्यावेळी त्याला संतोष जुवेकर हा झोपलेला दिसतो. तो प्रवासी बाजूला बसलेल्या प्रवासाला विचारतो की हा संतोष जुवेकर आहे का? त्यावर तो प्रवासी होकारार्थी मान डोलावतो.

यानंतर तो प्रवासी संतोष जुवेकरला उठवतो आणि सेल्फीसाठी विचारणा करतो. यावर संतोष जुवेकर त्या प्रवाशासोबत सेल्फीसाठी गॉगल काढून नीट बसतो. त्यावर तो चाहता त्याची खिल्ली उडवत हा काय संतोष जुवेकर आहे का? असे म्हणतं पुढे निघून जातो. त्याचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“चंद्राची भूमिका तुझ्यासाठी नेमकी काय?” अमृता खानविलकर म्हणते “ती फक्त लावणी…”

या व्हिडीओला संतोष जुवेकरने हटके कॅप्शन दिले आहे. “आपल्याकडे काही लोकांना वाटत गॉगल घातला असेल तरच तो actor नाहीतर कोणतरी फंट्टर…. तोंडावर हड करून गेला….”, असे कॅप्शन संतोष जुवेकरने दिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

संतोषचा ‘हिडन’ चित्रपट हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
संजय दत्तनं लग्नाआधी रणबीर कपूरला दिला खास सल्ला, म्हणाला…
फोटो गॅलरी