मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे शशांक केतकर. शशांकने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये शशांकने छाप उमटवली आहे. मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही शशांकने काम केलं आहे. पण आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमी गाजवण्यासाठी शशांक केतकर ( Shashank Ketkar ) सज्ज झाला आहे. यासंदर्भात नुकतीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता शशांक केतकरने ( Shashank Ketkar ) आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच आता हिंदी वेब सीरिजमध्ये अधिक पाहायला मिळत आहे. पण, गेल्या बऱ्याच वर्षांपासून शशांक रंगभूमीवर काम केलं नाही. पण आता लवकरच तो दिग्गज मंडळींबरोबर पाहायला मिळणार आहे.

शशांक शेवटचा ‘गोष्ट तशी गमतीची’ नाटकात दिसला होता. अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘गोष्ट तशी गमतीची’ नाटकात शशांक लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्यासह प्रमुख भूमिकेत होता. या नाटकानंतर शशांक ( Shashank Ketkar ) फारसा रंगभूमीवर दिसला नाही. आता लवकरच अभिनेता रंगभूमीवर येत आहे. ‘११ वपुर्झा’मध्ये शशांक असणार आहे.

‘११ वपुर्झा’चं पोस्टर आणि काही फोटो शेअर करत शशांक केतकरने लिहिलं, “११ वपुर्झा…रंगमंचावर असणं आणि आपल्या आवडत्या लेखकानी लिहिलेलं सादर करायला मिळणं हे भन्नाट आहे. व.पु काळेंच्या कथा आजही तितक्याच हसवतात, रडवतात, आरसा दाखवतात, चिमटे काढतात. मी, सुनील बर्वे आणि व पु काळे यांची कन्या स्वाती काळे चांदोरकर…तयार आहोत तुम्हाला पुन्हा त्या कथा कथनाच्या आणि पत्र वाचनाच्या काळात घेऊन जायला…११ झपुर्झा…ही साहित्य सहवास मधली वास्तू आणि वपुर्झा हे पुस्तक तर सर्वांच्या परिचयाचं आहे. असे हे ‘११ वपुर्झा’ नक्की या.”

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शशांक केतकरला ( Shashank Ketkar ) पुन्हा एकदा रंगभूमीवर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याच्या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अभिनंदन”, “आतुरतेने वाट पाहत आहोत…शशांक तुला खूप शुभेच्छा”, “तुला पुन्हा रंगभूमीवर पाहण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.