प्रिया बापट व उमेश कामत हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक आहेत. आयडियल कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रिया-उमेश दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. या दोघांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या फोटोंना गमतीशीर व्हिडिओना नेटकरी कमेंट करतात. सध्या हे लोकप्रिय जोडपं काश्मीरमध्ये फिरायला गेले आहेत. तिकडेच फोटो शेअर केले आहेत.

उमेशने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रियाबरोबरची एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तो बर्फातून चालताना दिसत आहे. तो असं म्हणतोय, “मी इथे निसर्गाचा आनंद लुटत आहे आरामात चालतो आणि प्रिया त्याच्याबरोबर निघून गेली आहे बघा छान गप्पा मारत चालली आहे. काश्मीरमध्ये माझ्याबरोबर आलेय एकदा गप्पा मारायला सुरवात केली की थांबत नाही, कसला विचार नाही उमेश मागे राहिलाय….” अशी त्याची प्रतिक्रिया होती. दोघे जात असताना त्यांच्याबरोबर एक गाईड होता मात्र चालताना प्रिया गप्पा मारत त्या गाईडबरोबर पुढे गेली उमेश मागेच राहिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेश व प्रिया २०११मध्ये विवाहबंधनात अडकले. याआधी ते एकमेकांना डेट करत होते. दोघेही गेली अनेक वर्ष नाटक,मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अनेकदा ते सोशल मीडियावर फोटो शेअर करत एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी ते दोघे हम्पीला फिरण्यासाठी गेले होते.