मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. अभिज्ञा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै हा सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे. या काळातही अभिज्ञा ही मेहुलच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे दिसत आहे. तसेच त्याला कर्करोगाशी लढण्यासाठी हिंमतही देताना दिसत आहे.

अभिज्ञाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती आणि तिचा पती मेहुल दिसत आहे. या व्हिडीओत ती मेहुलसोबत मजामस्ती करताना दिसत आहे. यावेळी त्या दोघांच्याही चेहऱ्यावर गोड हसू पाहायला मिळत आहे. एकीकडे हा मजेशीर व्हिडीओ करत असताना दुसरीकडे मेहुलवर उपचार सुरु असल्याचे तिने सांगितले आहे.

“पॅक-अपनंतर आम्ही आधी त्यावरचं रक्त काढायचो अन्…”, अमृता खानविलकरने सांगितला ‘चंद्रमुखी’च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

अभिज्ञाने हा व्हिडीओ शेअर करत त्याला फार हटके कॅप्शन दिले आहे. आम्ही आमच्या थेरपीच्या दिवसात काहीसे असे वागतो, असे कॅप्शन अभिज्ञाने या व्हिडीओला दिले आहे. त्यासोबत तिने #inbetweentheorapies असा हॅशटॅगही शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. अभिज्ञाची खास मैत्रीण मयुरी देशमुख हिने या व्हिडीओवर कमेंट करताना म्हटलं की, ‘तुम्ही दोघंही फार कमाल आहात. मला तुमच्या दोघांचाही प्रचंड अभिमान वाटतो.’ तर दुसरीकडे अभिनेत्री तेजस्विनी पंडित हीने ‘क्यूट’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबत अनेक कलाकारांनी ‘तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम. तुम्हाला लढण्यासाठी ताकद मिळो’, अशा कमेंटही यावर दिसत आहे.

“माफ करा मला…”, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. जवळपास १५ वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखायचे. पण कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला. यानंतर काही दिवसांनी ते दोघेही पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानतंर ६ जानेवारी २०२१ रोजी त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच मेहुलला कर्करोगाचं निदान झालं आहे. सध्या मेहुल हा रुग्णालयात उपचार घेत आहे.