Marathi Actress : गेल्या काही महिन्यांत मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा उपविजेता जय दुधाणेने काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडला मसुरी येथे प्रपोज केल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. आता या पाठोपाठ कलाविश्वातील आणखी एका अभिनेत्रीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. या अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्यासह खास फोटो शेअर करत, सुंदर असं कॅप्शन लिहिलं आहे.

कोळी गाण्यांमध्ये झळकणारा लोकप्रिय चेहरा म्हणजेच अभिनेत्री अंकिता राऊत. तिने आजवर अनेक मराठी गाण्यांच्या अल्बममध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘अप्सरा आली’ या कार्यक्रमात देखील सहभागी झाली होती. तिला सोशल मीडिया स्टार म्हणून देखील ओळखलं जातं. आता वैयक्तिक आयुष्यात अंकिता एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे.

अंकिता राऊतने इन्स्टाग्रामवर खास कॅप्शन लिहून आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अमृत कोंडे असं आहे. हे दोघेही एकमेकांना फार आधीपासून ओळखतात. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय पाहुयात…

“एकमेकांसाठी अनोळखी होतो मग हळुहळू एकमेकांचे मित्र झालो. पुढे, मित्र ते बेस्ट फ्रेंडपर्यंतचा प्रवास केला आणि आता आम्ही बेस्ट फ्रेंड्स ते लाइफ पार्टनर्स हा प्रवास करण्यासाठी सज्ज झालो आहोत… Found My Forever” असं म्हणत अंकिताने तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. या पोस्टसह तिने जोडीदाराबरोबरचे अनेक फोटो देखील शेअर केले आहेत.

अंकिता राऊतच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. गायिका सोनाली सोनावणे, सोशल मीडिया स्टार व अभिनेत्री तृप्ती राणे, निकिता सावंत यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत अंकिताला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amrut Konde (@amrut_konde)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंकिता राऊत बालकलाकार मायरा वायकुळ आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम सिंबा म्हणजेच साईराज केंद्रेसह ‘देवबाप्पा’ या गाण्यात सुद्धा झळकली होती. हे गाणं सुद्धा सर्वत्र चर्चेत आलं होतं.