वसईमधील २६ वर्षीय श्रद्धा वालकरच्या खूनाच्या बातमीमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. प्रियकर आफताब पूनावालाने तिचा खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करुन घरातल्या फ्रीजमध्ये ठेवले होते. पुढे तीन आठवड्यानंतर त्याने ते तुकडे जंगलामध्ये फेकून दिले. सहा महिन्यांपूर्वी केलेले हे दृष्कृत्य आता उघडकीस आले आहे. पोलिस चौकशीमध्ये आफताबने या गंभीर गुन्हाची कबुली दिली आहे. त्याने पोलिसांना अनेक चित्रपट आणि वेबसीरिज पाहिल्यानंतर अशाप्रकारे हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचल्याचे सांगितले आहे.

श्रद्धाचे २०१९ पासून आफताबशी प्रेमसंबंध होते. तेव्हा ते दोघेही वसईला वास्तव्याला होते. एका डेटिंग अ‍ॅपवर त्यांची ओळख झाली होती. ते दोघे एकाच कॉल सेंटरमध्ये काम करत होते. काही महिन्यांनंतर श्रद्धाने तिच्या कुटुंबियांना अफताब आणि तिच्या नात्याबद्दल सांगितले. आंतरधर्मीय विवाहाला विरोध असल्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला. कुटुंबियांचा विरोध पत्करत ती आफताबसह नायगाव येथे राहायला गेले. मार्च २०२२ मध्ये ते दिल्लीला राहायला गेले. दिल्लीला गेल्यावर श्रद्धाने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला. या मुद्द्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. भांडणादरम्यान आफताबने गळा आवळून तिचा खून केला.

आणखी वाचा – लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने शेअर केला पहिला फोटो, पोस्ट व्हायरल

या प्रकरणावर सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहेत. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटी यावर व्यक्त होत आहेत. अभिनेत्री केतकी चितळेने याबद्दलची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने “मेरा अब्दुल ऐसा नहीं. बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात?!!!? #जागोमेरेदेश” असे लिहिले आहे.

आणखी वाचा – गायक अदनान सामी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; म्हणाले, “तुमचा पर्दाफाश…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केतकीची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टखाली लोकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अशाच एका पोस्टमुळे केतकी चर्चेत आली होती.