‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला कायम ओळखले जाते. मानसी नाईकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात होतं. काही दिवसांपूर्वी मानसीने तिचे आणि प्रदीपचे एकत्र फोटोही डिलीट केले होते. त्यानंतर तिने खरेरा हे आडनावही हटवलं आहे. यामुळे ती लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अखेर मानसी नाईकने या चर्चांवर अप्रत्यक्षरित्या मौन सोडले आहे.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी गाण्याबद्दल, चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत पोस्ट करताना दिसत आहे. यातील बहुतांश पोस्ट या भावूक असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे तिचे वैवाहिक आयुष्य बिघडल्याचे बोललं जात होतं. अखेर तिने यावर भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “नातेसंबंध तोडण्यापूर्वी…” पतीच्या वाढदिवशी मानसी नाईकच्या पोस्टने वेधले लक्ष

मानसी नाईकने केलेली पोस्ट

“आपल्या आयुष्यात अनेक मित्र येतात जे तुमच्यासाठी सतत खंबीरपणे उभे राहत असतात. तुम्ही जे जसे आहात, तसे ते तुम्हाला स्वीकारतात आणि त्याबद्दल त्यांच्या मनात तुमच्याविषयीच आदरच असतो. ते तुमच्यासाठी लढतात. तुम्हाला सहभागी करुन घेतात. तुम्हाला प्रोत्साहन देतात. काहीही झालं तरी ते तुमच्यासाठी खंबीरपणे उभे राहतात.

पण माझ्या आयुष्यात अशी काही माणसं अपवादाने आली की ज्यांनी मित्राचा बुरखा घेतलेला होता मात्र त्यांनी वरीलपैकी कोणतीही गोष्ट केली नाही.

माझ्या या कठीण काळात माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या संदर्भातील माहितीचा कोणी गैरवाजवी उपयोग करत असेल तर कृपया त्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. ही विनंती सर्वांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आहे”, असे मानसी नाईकने यात म्हटले आहे.

Manasi Naik

आणखी वाचा : “तिला कंट्रोल…” दीपाली सय्यद यांनी मानसी नाईक-प्रदीपच्या लग्नाबद्दल केलेला खुलासा

दरम्यान मानसीने शेअर केलेली ही स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनेकांना ही स्टोरी वाचून धक्का बसला आहे. तसेच तिने शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम स्टोरीचे तिच्या खासगी आयुष्याशी आणि घटस्फोटाशी संबंध जोडला जात आहे. मात्र अद्याप तिने यावर काहीही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण आता दोघांनीही इन्स्टाग्रामवरून त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.