‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. ती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. सध्या प्राजक्ता ही लंडन दौऱ्यावर गेली आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर आता तिने तिच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ती तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी लंडनमध्ये गेल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आता प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत. या व्हिडीओद्वारे तिने तिची एक इच्छा देखील बोलून दाखवली आहे. तिचा हा व्हिडीओ आणि कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा : “माझं ब्रेकअप झालं होतं अन् त्यावेळी…”, प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्ट

“फिरायला मिळालेला इंग्लंड हा १३ वा देश. (खात्री आहे, फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर देश मोजत असणार… एक आईबरोबरची दुबई trip सोडल्यास सगळ्या trips कामानिमित्त किंवा sponsored होत्या, देवाचे किती म्हणून आभार मानू. #मध्यमवर्गीयांचीसुखं.)

स्वतःच्या अथवा इतरांच्या पैशाने, कसही चालेल; पण सगळे देश फिरायची इच्छा आहे…जगचं काय, चंद्र- मंगळ, अंतराळसुद्धा बघण्याची इच्छा आहे..अर्थात; देव जे जे दाखवेल ते आणि तेवढंच बघायला (भोगायला- त्यागायला) तयार आहे. चला आता फार फिलॅासॅाफी झाडत बसत नाही, लंडनवारी चे फोटो शेअर करत राहीन. तुम्हीही वर्च्युअल वारी करून घ्या”, असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड…”, वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्राजक्ता माळी ही गेल्या काही दिवसांपासून रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. इतकंच नव्हे तर ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वाय चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता ती आणखी एका चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे नाव, स्टार कास्ट याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.