अभिनेत्री प्रिया बापट सध्या 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या तिसऱ्या सीझनमुळे चांगलीच चर्चेत आहे. प्रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. प्रियाचे संपूर्ण बालपण दादरमध्ये गेले असून ती बालमोहन शाळेची माजी विद्यार्थिनी आहे याचा उल्लेख तिने अनेकदा केला आहे. आता 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या निमित्ताने अभिनेत्रीने सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन या सर्व आठवणींना उजाळा देणारा एक सुंदर व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हेही वाचा : “लग्न, घटस्फोट त्यानंतर एकमेकांचे…” करिश्मा कपूरला पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर पाहून नेटकरी संतापले, म्हणाले… प्रियाने बाप्पाचे दर्शन घेतल्यावर आपल्या बालपणीच्या चाळीतल्या घराची झलक चाहत्यांना दाखवली. या वेळी तिने चाळीतल्या घरात गणपतीसाठी तिचे कुटुंबीय कुठे सजावट करायचे, आयुष्यातील पहिला परफॉर्मन्स तिने कुठे सादर केला आणि घरात ती अभ्यासाला कुठे बसायची याची माहिती दिली. त्यानंतर प्रिया थेट शिवाजी पार्कमध्ये पोहोचली. या ठिकाणी बोलताना "शिवाजी पार्क आणि दादर म्हणजे माझं प्रेम" असा उल्लेख तिने केला. पुढे अभिनेत्रीने आस्वाद उपाहारगृहाला भेट देऊन बालमोहन शाळा दाखवली आणि "आज मी जे काही आहे त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या शाळेला जाते," असे प्रियाने व्हिडीओच्या शेवटी आवर्जून सांगितले. हेही वाचा : “जंगली रमीची जाहिरात करून…” नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थ चांदेकरचे रोखठोक उत्तर, म्हणाला, “तुमच्याइतके मल्टी टॅलेंटेड…” प्रिया या व्हिडीओला सुंदर कॅप्शन देत लिहिते, "घर, जिथे आपली स्वप्नं फुलतात… मी नशीबवान आहे म्हणून या शहरात माझा जन्म झाला. दादरच्या एका चाळीत मी लहानाची मोठी झाले…आणि आज देशभरातून मला एवढे प्रेम मिळत आहे. या जागेने, शहराने मला सर्वकाही दिले. मी कायम ऋणी असेन…" https://www.instagram.com/reel/CsxdhBtv32m/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== प्रिया बापटचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून तिचे चाहतेसुद्धा हा सर्व प्रवास पाहून तिचे कौतुक करीत आहेत. दरम्यान, २६ मे रोजी प्रियाची मुख्य भूमिका असलेल्या 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.