अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ९० च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये करिश्माने काम केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून करिश्मा मोठ्या पडद्यापासून दूर आहे, परंतु सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री करिश्मा पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर एकत्र डिनर डेटवर गेल्याने नेटकऱ्यांनी करिश्माला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : “जंगली रमीची जाहिरात करून…” नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थ चांदेकरचे रोखठोक उत्तर, म्हणाला, “तुमच्याइतके मल्टी टॅलेंटेड…”

२००३ मध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरने बिझनेसमन संजय कपूरबरोबर लग्नगाठ बांधली. कालांतराने दोघांच्या नात्यातील कटुता वाढली आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. संजय कपूरने मारहाण केल्याचा आणि वैवाहिक जीवनात त्रास झाल्याचा उल्लेख करिश्माने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. अखेर २०१६ मध्ये करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला. पण, सध्या करिश्माचा पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर डिनर डेटला जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिजची घोषणा; मराठमोळा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर शेअर करीत म्हणाला…

पापाराझींनी अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर यांना मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहिले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी करिश्माला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करीत, “बॉलीवूडमध्ये चांगला ट्रेंड सुरू आहे, आधी लग्न करा, घटस्फोट घ्या, नंतर एकमेकांचे मित्र व्हा..” तसेच दुसऱ्या एका युजरने “घटस्फोटानंतर उरलेले पैसे घेण्यासाठी भेटली असेल,” असे लिहीत करिश्माला ट्रोल केले आहे.

दरम्यान, घटस्फोट झाल्यावर करिश्मा तिची दोन्ही मुले समायरा आणि कियान यांचा सांभाळ करते तसेच संजय कपूरने घटस्फोटानंतर प्रिया सचदेवाबरोबर दुसरे लग्न केले आहे.

Story img Loader