मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन २ मुळे ती चर्चेत आली होती. शिवानी सुर्वेला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आहे. शिवानी एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. शिवानीचा ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’मधील लूक समोर आला आहे.

कलाकार नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेच्या शोधात असतात. त्यात मराठी चित्रपटात एखाद्या अभिनेत्रीला आव्हानात्मक भूमिका करायला मिळणं म्हणजे स्वप्नपूर्ती असते. अभिनेत्री शिवानी सुर्वेनेही साचेबद्ध भूमिकेत अडकून न राहता, नवीन आव्हान स्वीकारले आहे. दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या पॅन इंडिया चित्रपटात झळकणार आहे.

आणखी वाचा : Video : ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् बाप्पाचा जयघोष, आदर्श शिंदे यांच्या आवाजातील नवं गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

शिवानी सुर्वेचा या अॅक्शन अंदाजातील पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. शिवानीच्या वाढदिवसानिमित्ताने तिचे हे पोस्टर जाहीर करण्यात आले आहेत. यात ती एका विशिष्ट युनिफॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी तिच्या हातात बंदूक आणि डोळ्यात राग पाहायला मिळत होते. तिचा हा लूक फारच वेगळा असल्याचे यातून दिसत आहे. शिवानी सुर्वेने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटातील अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गोड हास्य आणि सुंदर चेहरा अशा भूमिकेत शिवानी आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. मात्र आता तिच्यात पूर्णपणे विरोधाभास पाहायला मिळत आहे.

या लूकबद्दल शिवानी सांगते, “आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा माझ्यासाठी खूप महत्वाचा चित्रपट आहे. आम्हाला हा लूक करताना खूप मजा आली. खरतर स्वतःला या गणवेशात पाहणं सुरुवातीला वेगळं वाटत होतं. याची सवय होण्यासाठी मला एक दिवस गेला. माझ्यासाठी हा निर्णय धाडसी होता. आपल्याकडे साधारणपणे नायिकेला सुंदर दाखवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण या भूमिकेची गरज अशी होती. त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार न करता, हा लूक ठरवावा लागला होता.

आणखी वाचा : सारा तेंडुलकर नाही तर सारा अली खानला डेट करतोय शुबमन गिल? फोटो होतोय व्हायरल

“एखाद्या कलाकाराला चांगली भूमिका मिळवण्यासाठी खूप वर्षे लागतात. पण माझ्यासाठी हा रोल बेस्ट आहे, असे मला वाटते. मी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. या भूमिकेच्या मुळापाशी जाऊन मी काम केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसमोर हा लूक घेऊन येताना खूप आनंद होतो आहे”, असेही शिवानीने म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा चित्रपट मराठी – कन्नडा भाषेत चित्रीत करण्यात आला आहे. तर हिंदी, तेलुगु, मल्याळम, तमिळ या भाषेतही ही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र यांनी केले आहे. या चित्रपटात मराठी-कन्नडा कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र दिसून येणार आहे. मराठी चित्रपटात अॅक्शन-रोमँटिक चित्रपट कमी येतात. त्यामुळे हा चित्रपट फार वेगळा ठरणार आहे. दीपक राणेंसोबत या चित्रपटाची निर्माता विजय कुमार शेट्टी आणि रमेश कोठारी यांनी केली.