नवरात्रीचे दिवस सुरु झाले की अनेकांचं लक्ष अभिनेत्री तेजस्विनी पंडितकडे वळतं. दरवर्षी नवरात्रीच्या दिवसांमध्ये तेजस्विनी देवीच्या रुपात समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असते. यंदा तेजस्विनी करोना संकटात लढणाऱ्या योद्ध्यांविषयी व्यक्त होताना दिसत आहे. त्यातच आज नवरात्रीची चौथी माळ असल्यामुळे तिने शेतकऱ्यांशी निगडीत एक फोटो शेअर केला आहे.
तेजस्विनीने यावेळी शेतात कष्ट करणारी शेतकरी महिला दाखविली आहे. जिच्या पाठीवर तिचं लहान बाळ बांधलेलं आहे. एका हातात विळा आणि पाठीवर बाळ अशी कसरत करुन ही स्त्री जीवनाची गाडी हाकत आहे. मात्र, या स्त्रीमध्येदेखील देवीचा अंश आहे असा आशय या फोटोतून पाहायला मिळत आहे.
शिवारात या माह्या कदी आभाय फुटलं, कदी धरिनी रुसली. पन माय हे तुयी हर दैवाशी भांडली, दम धर रे लेकरा हात चालवू दे मले भरभर. तेथं लेकरं हजार वाट पाह्यते मंडईवर…, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, तेजस्विनी दरवर्षी नवरात्रीमध्ये देवीच्या रुपातील फोटो शेअर करत असते. यापूर्वी तिने पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांच्या कार्याला सलाम केला आहे.