अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे. वैदेहीने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत भूमिका साकारत आपला एक वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. वैदेही परशुरामीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तिने व्हॅलेंटाईन डे कोणाबरोबर साजरा करायला आवडेल यावर भाष्य केलं आहे.

व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेमवीरांचा, या दिवशी आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस. हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वैदेही ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी गेली होती. तेव्हा एका मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की “कोणत्या अभिनेत्याबरोबर तुला व्हॅलेंटाईन डे साजरा करायला आवडेल?” यावर तिने लगेच प्रतिक्रिया दिली की, “मला आर माधवनबरोबर हा दिवस साजरा करायला आवडेल कारण अनेकवर्षांपासून मी त्याची चाहती आहे.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

“मला बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे पण…” ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकलेल्या एमसी स्टॅनने दिली प्रतिक्रिया

मध्यंतरी वैदेहीचे नाव युटूबर यशराज मुखाटेबरोबर जोडले गेले होते मात्र तिने यावर नकार दिला होता. नुकताच तिचा ‘जग्गू आणि ज्युलिएट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अमेय वाघदेखील आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार महेश लिमये यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान वैदेही आता ‘एक दोन तीन चार’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.हा चित्रपट एक हलकी-फुलक लव्हस्टोरी असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून निपुण आणि वैदेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.