छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगताप हिच्याकडे पाहिले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच वीणा जगतापने तिच्या आणि शिव ठाकरेच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तिने एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना याबद्दल स्पष्टपणे मत व्यक्त केले.

बिग बॉस मराठी २ हे पर्व शिव आणि वीणा यांच्या लव्हस्टोरीमुळे चांगलाच गाजला. या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे बिग बॉसला चार चांद लागले होते. विशेष म्हणजे वीणाने शिवच्या नावाचा टॅटूही हातावर गोंदवून घेतला होता. तसेच शिव बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर तिने जंगी सेलिब्रेशनही केले होते. ते दोघेही सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करताना दिसले होते. मात्र त्यानंतर त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. त्यांचा ब्रेकअप का झाला? यामागचे कारण काय? दोघांमध्ये नेमंक काय बिनसलं? याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. मात्र नुकतंच वीणाने याबद्दल मौन सोडत स्पष्टपणे भाष्य केलं.
आणखी वाचा : “मी संपलेली नाही…” आजारपणासह सोशल मीडिया एक्झिटबद्दल समांथा स्पष्टच बोलली

वीणाने नुकतंच इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. यावेळी तिला एका युझरने शिवबद्दल प्रश्न विचारला. शिव दादा आणि तुझ्यात काय सुरु आहे? असा प्रश्न तिला एका चाहत्याने विचारला. त्यावर उत्तर देताना ती चांगलीच भडकली. तिने तिच्या या चाहत्याला सडेतोड उत्तर दिले.

“पहिले आणि शेवटचं…. मी कोणत्याही व्यक्तीला माझ्या खासगी आयुष्याबद्दल माहिती देण्यासाठी बांधील नाही. थोडीतरी नैतिकता बाळगा आणि इतरांना मोकळा श्वास घेऊ द्या. मी कधी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल विचारते का? की तुमचे काय सुरु आहे आणि काय नाही? कारण मी नेहमी माझ्याबद्ल आणि माझ्यापुरती मर्यादित असते”, असे वीणा म्हणाली.

shiv thakare veena jagtap breakup

आणखी वाचा : तृतीयपंथी विशिष्ट पद्धतीने टाळी का वाजवतात? गौरी सावंत यांनी सांगितले खरे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीणाने दिलेल्या या उत्तरामुळे तिचे आणि शिवचे बिनसलं असल्याचे उघड झालं आहे. दरम्यान सध्या शिव हा बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात सदस्य म्हणून सहभागी झाला आहे. तर वीणा ही अनेक मालिकांमध्ये झळकत असल्याचे पाहायला मिळत आहे.