क्रिकेट हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय, मग आपले लाडके कलाकार कसे मागे राहतील? आपल्या मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार क्रिकेटचे शौकीन आहेत. मात्र शूटिंग, वेळेचा अभाव यामुळे त्यांना आपली आवड जोपासता येत नाहीत. हेच कारण लक्षात घेऊन अभिनेता सुशांत शेलार यांनी मराठी बॉक्स सेलिब्रिटी क्रिकेट लीगची (एमबीसीसीएल) स्थापना केली आहे. ‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत एमबीसीसीएलच्या लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या लोगोमध्ये महाराष्ट्राची शान दर्शवणाऱ्या पिळदार मिश्या, फेटा, बॅट, बॉल आणि स्टंप दिसत आहेत.
Photos : एप्रिल महिन्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी! ६ वेबसीरिज आणि चित्रपट होणार रिलीज




आता लोगोचे अनावरण झाले असून लवकरच एमबीसीसीएलमध्ये महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या कलाकारांचा खेळ पाहायला मिळणार आहे. ही एक खरीखुरी क्रिकेटची मॅच असून यात काही संघ असतील. फक्त पुरुषच नाही तर महिला कलाकारही या खेळात सहभागी होणार आहेत. लवकरच हे संघ जाहीर होणार असून महाराष्ट्रातील विविध शहरातल्या प्रसिद्ध ठिकाणाचे नाव प्रत्येक संघाला दिले जाणार आहे. यानिमित्ताने खेळ आणि महाराष्ट्रातील वास्तुंना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
जाणून घेऊया, बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार परवीन बाबी यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी
मुळात क्रिकेट हा प्रत्येकाचाच आवडीचा विषय आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रीय कलाकारांना एकत्र घेऊन या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटच्या खेळाडूंना आपण नेहमीच खेळताना बघतो. अभिनय करणाऱ्या कलाकारांचा खेळ पाहण्याची संधी प्रेक्षकांना या निमित्ताने मिळणार आहे. प्रत्येक संघात कलाकार, दिग्दर्शक, चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ अशा सगळ्यांचाच समावेश असणार आहे.