69th National Film Awards Ceremony Updates in Marathi : ६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा १७ ऑक्टोबरला दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हेही वाचा : ठरलं तर मग : “मधूभाऊंची सुटका होईल का?”, जोगतीण सायलीला देणार ‘हा’ आशीर्वाद, मालिकेचा नवा प्रोमो आला समोर…

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ या पुरस्कारने, तर ‘गोदावरी’ चित्रपटासाठी निखिल महाजन यांचा ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ म्हणून गौरव करण्यात आला. याशिवाय शेखर बापू रणखांबे या सांगलीच्या दिग्दर्शकाला ‘रेखा’ या माहितीपटासाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

हेही वाचा : “दुर्दैवाने होतं ते…” ‘विनाकारण राजकारण’साठी पुरस्कार मिळाल्यानंतर रुपाली भोसले असं का म्हणाली?

‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. ‘गोदावरी’ चित्रपटाचं संपूर्ण कथानक गोदावरी नदीभोवती फिरत असून या चित्रपटाद्वारे अनोखी नाती उलगडत जातात. परंपरा, भावना, नात्यामधील चढउतार, आयुष्यातील गुंतागुंत मांडण्यासाठी गोदाकाठ एक धागा आहे. गोदावरी चित्रपटामधून प्रेक्षकांना तीन पिढ्यांमधील संघर्ष आणि त्यांच्यात असणारा समान धागाही पाहायला मिळेल.

हेही वाचा : “हा पुरस्कार तुमचा आहे”, ‘एकदा काय झालं’साठी सलील कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ दोन व्यक्तींना दिलं श्रेय

View this post on Instagram

A post shared by Nikhil Mahajan (@nikmahajan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोदावरी चित्रपटात जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, नीना कुलकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, दिवंगत अभिनेते विक्रम गोखले या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, निखिल महाजन यांनी हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार दिवंगत अभिनेते विक्रम गोखले आणि दिग्दर्शक निशिकांत कामत यांना समर्पित केला आहे. विक्रम गोखलेंनी निखिल महाजन यांना पहिल्याच दिवशी ते हा मानाचा पुरस्कार जिंकतील असा आशीर्वाद दिला होता ही आठवण दिग्दर्शकाने ऑगस्टमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यावर सांगितली होती.