70th National Film Awards Whole List : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज( १६ ऑगस्ट ) दिल्ली येथे करण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालखंडात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच CBFC द्वारे प्रमाणित फीचर आणि नॉन-फीचर चित्रपटांचा समावेश होता. मल्ल्याळम चित्रपट ‘अट्टम’ने बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कारवर आपलं नाव कोरलं आहे. तर, सर्वोत्कृष्ट कन्नड सिनेमा म्हणून ‘केजीएफ चाप्टर २’ ची निवड करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे, यंदाही ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ( 70th National Film Awards ) मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळाला. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान पटकावला आहे. तर, ‘मुरमूर्स ऑफ द जंगल’ या मराठी डॉक्युमेंट्रीने, सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री आणि सर्वोत्कृष्ट निवेदक असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळवले आहेत.
हेही वाचा : हुबेहुब राज ठाकरे, तेजस्विनी पंडित अन् शूटिंगचा सेट; अभिनेत्री आणणार मनसे प्रमुखांवर चित्रपट? ‘तो’ फोटो व्हायरल
७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कोणी बाजी मारली जाणून घेऊयात, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
सर्वोत्कृष्ट चित्रपट – अट्टम
सर्वोत्कृष्ट अभिनेता – ऋषभ शेट्टी, कांतारा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नित्या मेनन, तिरुचित्रबलम आणि मानसी पारेख, कच्छ एक्स्प्रेस
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सूरज बडजात्या, उंचाई
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता, उंचाई
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन मल्होत्रा, फौजी
सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट – कांतारा
सर्वोत्कृष्ट पदार्पण – प्रमोद कुमार
सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट – कार्तिकेय २
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – पोन्नियिन सेल्वन – भाग १
सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट – Baaghi Di Dhee
सर्वोत्कृष्ट मल्ल्याळम चित्रपट – सौदी वेल्लाक्का CC.225/2009
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – केजीएफ चाप्टर २
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
सर्वोत्कृष्ट तिवा चित्रपट – सिक्यसाल
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट – काबेरी अंतरधन
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट – इमुथी पुथी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शत – प्रितम, ए आर रहेमान
सर्वोत्कृष्ट गायक – ब्रह्मास्त्र अरिजितसिंह
सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट – केजीएफ चाप्टर २
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट – द कोकोनट ट्री
सर्वोत्कृष्ट निवेदक – मुरमूर्स ऑफ द जंगल
बेस्ट डॉक्युमेंट्री – मुरमूर्स ऑफ द जंगल
70th National Film Awards: Manoj Bajpayee starrer 'Gulmohar' bags Best Hindi Film
Read @ANI Story | https://t.co/N03fPTgncQ#Nationalfilmawards #Bollwywood #Gulmohar pic.twitter.com/uekrfI9PGnThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— ANI Digital (@ani_digital) August 16, 2024

दरम्यान, दिग्दर्शक परेश मोकाशी आणि अभिनेत्री व लेखिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुगंधा कुलकर्णी यांच्या आतापर्यंत एकूण तीन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ यानंतर आता त्यांच्या ‘वाळवी’ चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून ‘वाळवी’ चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.