दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने वडिलांच्या पावलावर पाऊत ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘ती सध्या काय करते’ चित्रपटात अभिनयने आर्या आंबेकरसह प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसह तो ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटात झळकला. लवकरच अभिनय ‘बॉईज ४’ चित्रपटाच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : Video: लंडनच्या रस्त्यावर गौरव मोरेचा भन्नाट डान्स, DDLJ मधील शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकला फिल्टर पाड्याचा बच्चन

‘बॉईज ४’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडल्यावर अभिनयने त्याच्या चित्रपटातील लूकचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “ट्रेलर बघितला की नाही? बघितला नसेल तर लगेच बघा हा माझ्या पहिल्या लूक टेस्टचा फोटो आहे.” असं कॅप्शन अभिनयने या फोटोला दिलं आहे.

हेही वाचा : अपघातानंतर प्रतिमाची गेली वाचा अन् सायली…, ‘ठरलं तर मग’ मालिकेचं कथानक रंजक वळणावर, पुढे काय घडणार?

अभिनयने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्याच्या एका चाहत्याने त्याला “‘बॉईज ४’च्या ट्रेलरमध्ये तुझे सीन्स कट का केलेत?” असा प्रश्न विचारला. यावर, “त्यांनी असं केलेलं नाही. आम्हाला माझ्या भूमिकेबद्दल ट्रेलरमध्ये जास्त उलगडा करायचा नव्हता. म्हणून या भूमिकेबद्दल ट्रेलरमध्ये जास्त काही दाखवलेलं नाही. चित्रपटगृहात तुम्हाला अनेक सरप्राईज मिळतील.” असं उत्तर अभिनयने त्याच्या चाहत्याला दिलं आहे.

abhinay
अभिनय बेर्डे

हेही वाचा : सनी देओलचा मुलगा अन् पूनम ढिल्लोंच्या मुलीचं बॉलीवूड पदार्पण, राजवीर-पलोमाच्या ‘दोनों’ने कमावले फक्त ३० लाख रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बॉईज ४’ चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.