दिवंगत मराठी अभिनेते रमेश देव व अभिनेत्री सीमा देव यांचे पूत्र अजिंक्य देव अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अजिंक्य यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी बाळासाहेबांबरोबरच्या भेटी, त्यांचं बोलणं, त्यांनी देव कुटुंबाला केलेली मदत याबद्दल भाष्य केलं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडताना ओंकार भोजने काय म्हणाला होता? दिग्दर्शक व निर्माते म्हणाले, “तो खूप…”

अजिंक्य देव म्हणाले, “मी लहान असल्यापासून आई-बाबांबरोबर मातोश्रीवर जायचो, त्यामुळे बाळासाहेबांना भेटायचो. मी त्यांच्या मांडीवर बसलो आहे. त्यांचं वलय काय आहे, हे मला लहानपणी माहीत नव्हतं. मोठा झाल्यावर कळायला लागलं. एकदा माझ्या एका चित्रपटाच्या मुहुर्त शॉटचं शुटिंग चाललं होतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे शुटिंग पाहायला आले होते. माझा पहिला सीन घोड्यावरचा होता. मी त्यांच्याजवळ गेल्यावर त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि छान घोडा चालवतोस, बापाचं नाव मोठं करशील, असं ते म्हणाले होते.”

“ती सोडून गेली तेव्हा…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकांनी सांगितलं विशाखा सुभेदारने शो सोडण्याचं कारण

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत पुढे ते म्हणाले, “मी बाळासाहेब ठाकरेंना मी अनेकदा भेटलो आहे. एकदा मी मातोश्रीवर गेलेलो तेव्हा बाळासाहेब स्वतः आले आणि गप्पा मारत होते. कोणतीही गोष्ट बोलताना, कोणतीही गोष्ट सांगताना त्यांचं बोलणं खूप स्फुर्तिदायक असायचं. ते खूप मनापासून बोलायचे. ते कधीच ठरवून बोलायचे नाहीत. आपल्या महाराष्ट्राला आज त्यांची खरी गरज होती. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मला या सगळ्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद लाभला.”

पुढे ते म्हणाले, “माझे पहिले दोन चित्रपट मी भालजी पेंढारकर यांच्याकडे केले. अनंत मानेंकडे मी काम केलं. बाळासाहेबांचे आशीर्वाद पाठीशी होतेच. खरं तर त्यांच्या कुटुंबाचेच आमच्यावर खूप उपकार आहेत. देव कुटुंबाला ठाकरे कुटुंबाने नेहमीच खूप मदत केली आहे आणि ते कायम आमच्या पाठिशी उभे राहिले आहेत.”

View this post on Instagram

A post shared by Ajinkya R Deo (@ajinkkyadeo)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६० वर्षीय अजिंक्य गेली अनेक वर्षे सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं पसंत केलं. आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि इंग्लिश चित्रपटातही काम केलं. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान, अजिंक्य यांच्या आई ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे काही महिन्यांपूर्वी २४ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले.