Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२३-२४ साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावर आता राजकीय श्रेत्रातील मंडळींसह कलाविश्वातील मंडळीही आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत.

अभिनेता आरोह वेलणकरने अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ट्वीट करत याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. आरोह म्हणाला, “सकारात्मक अर्थसंकल्प. अर्थपूर्ण आणि दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प सादर केल्याबाबत निर्मला सीतारमण यांचे आभार.”

आरोहने त्याच्या ट्विटद्वारे यंदाच्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. तर त्याने निर्मला सीतारमण यांचे आभारही मानले. आरोहबरोबरच अभिनेता स्वप्निल जोशीनेही अर्थसंकल्पाबाबत त्याचं मत मांडलं. त्याने ट्वीट करत २०२३-२४ साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्पाचा उल्लेख केला.

आणखी वाचा – Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर मराठी अभिनेत्याचे ट्वीट, म्हणाला “आज सगळेच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“….आज सगळेच experts आहेत !” #Budget असे ट्वीट स्वप्निलने केलं आहे. त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या अर्थसंकल्पात कर्ज, करात सवलत, शेतकरी, व्यावसायिक, महागाई अशा महत्वाच्या क्षेत्रांविषयी घोषणा करण्यात आल्या आहेत.