scorecardresearch

“घाणेरडं कंबरे खालचं लिहायचं आणि…” कोणावर भडकले शरद पोंक्षे? शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

शरद पोंक्षे यांचा राग अनावर, सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

sharad ponkshe on trollers sharad ponkshe
शरद पोंक्षे यांचा राग अनावर, सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या रोखठोक वक्तव्यमुळे कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते फार सक्रिय असतात. नेहमी त्यांच्या व्याख्याना दरम्यानचे व्हिडीओ शरद पोंक्षे इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करतात. या माध्यमातून माहितीपूर्ण व्हिडीओ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण सोशल मीडियाचा जे गैरफायदा घेतात त्यांच्याबाबत शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Video : “आयुष्यात कधीच कुटुंबियांच्या…” सिद्धार्थ जाधवचं लग्नाबाबत भाष्य, अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

काय म्हणाले शरद पोंक्षे?

सोशल मीडियाद्वारे घाणेरडी कमेंट करणाऱ्यांना शरद पोंक्षे यांनी सुनावलं आहे. ते म्हणाले, “सोशल मीडियाचा शोध लागला आणि सामान्य माणसाला व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं. पण ते कस व्यक्त व्हावं? केव्हा व्हावं, ते मात्र त्याला कळल नाही. काहींनी त्याचा ऊत्तम वापर करून घेतला तर काहींनी लोकांना शिव्या शाप देण्यासाठी त्याचा वापर केला. बरं इथेही शिव्या द्यायला हरकत नाही त्याला हिंमतही लागते. पण ती पुराव्या सकट असावी, सुसंस्कृत असावी. पण नाही, वाट्टेल ते पुराव्या शिवाय बोलायचं असतं कित्येकांना. मग फेक अकाऊंट बनवायची व वाट्टेल ते लिहायचं.”

“गलीच्छ शब्द वापरायचे सत्य काहीही माहिती नसताना, शुन्य वाचन असताना, ते समजून न घेता फक्त लिहीत रहायचं. पोस्ट काय आहे त्यावर व्यक्त न होता त्या माणसाविषयीची मनातली अनाठायी असलेली मळमळ बाहेर काढायची. बरं त्या माणसाविषयी काहीही माहिती करून न घेता केवळ ऐकीव गोष्टींवर लिहीत रहायचं. घाणेरडं कंबरे खालचं लिहायचं. बरं हे घाणेरड लिहीणारे त्यांचे प्रोफाईल पाहिलं की लक्षात येतं एका विशिष्ठ पक्षाची माणसं असतात.”

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

पुढे ते म्हणाले, “एका विशिष्ठ संघटनेची माणसं असतात. ज्यांच्या नेत्यांनी तसेच संस्कार त्यांच्यावर केलेले असतात. जातीद्वेश त्यांच्यात इतका ठासून भरलेला असतो की तो शब्दा शब्दातून दिसतो. त्यांना स्वतः काहीही कर्तृत्व दाखवता येत नाही. मग दुसऱ्यांच्या शिक्षणावर, पैशांवर, व्यवसायावर ते उगाचच टीका करतात. पोस्टचा व त्यावरच्या टीकेचा काहीही संबंध नसतो. त्यातून ते त्यांच्यावरचा संस्कार दाखवून देतात. त्यामुळे अशांना कसलंही उत्तर न देता दुर्लक्ष करावं किंवा ब्लॉक करावं. त्यांना कधीही उत्तर देऊ नये. तसेच आपला वेळ वाया घालवू नये. कारण आपली पोस्ट सुसंस्कृत लोकांसाठी असते, ते खुप छान प्रतिक्रिया देतही असतात. बास त्यांच्यापर्यंत पोचणं महत्वाचं. बाकीच्या भुंकणाऱ्यांना शुन्या एवढीही किंमत देऊ नये. मला अनेक लोक विचारतात की तूम्ही ह्या ट्रोलर्संना कसं हँडल करता? म्हणून हे सांगीतलं.” शरद पोंक्षे यांनी या पोस्टच्या माध्यमातून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 12:07 IST