सध्या मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची लाट आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. नुकताच डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट प्रदर्शित झाला. आता काही दिवसांपूर्वीच झी स्टुडिओने ‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता या चित्रपटामधील आणखी एका कलाकाराचं नाव समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Photos : नवऱ्यासह जेजुरी गडावर पोहोचली कार्तिकी गायकवाड, रोनितने उचलली खंडेरायांची ४२ किलो वजनाची खंडा तलवार

अभिनेता शरद केळकर चित्रपटामध्ये बाजीप्रभु देशपांडे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच बाजीप्रभु देशपांडे यांच्या लूकमधील शरदचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. आता अभिनेत्री अमृता खानविलकरची या चित्रपटामध्ये एण्ट्री झाली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे चित्रपटामधील लूक शेअर करत याबाबत माहिती दिली.

अमृता ‘हर हर महादेव’मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामधील तिचा लूक समोर आला आहे. नाकात नथ, कपाळावर टिकली, खांद्यावर पदर, लक्षवेधी नजर असा अमृताच लूक या पोस्टरमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – Video : पत्नीला पाहताच मिठी मारली अन् रडू लागले अमिताभ बच्चन, पण नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

तिने ‘हर हर महादेव’मधील आपला लूक शेअर करताना म्हटलं की, “योद्ध्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत घराचा डोलारा सांभाळणारी स्त्रीदेखील योद्धाच असते. गनिमांना कंठस्नान घालणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत अभिनेत्री अमृता खानविलकर. लढण्यासाठी लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरपासून ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार.” अमृताचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor subodh bhave har har mahadev historical movie actress amruta khanvilkar play bajiprabhu deshpande wife in film see poster kmd
First published on: 07-10-2022 at 19:47 IST