अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण अनेक ठिकाणी या चित्रपटाला स्क्रिन्स मिळत नसल्याची तक्रार समोर येत आहे. नुकतंच यावरुन ईशा केसकरने भाष्य केले आहे.

‘सरला एक कोटी’ या चित्रपटात अभिनेत्री ईशा केसकर मुख्य भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि गाणी सुपरहिट ठरली होती. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होईल, असं बोललं जात होतं. मात्र नुकतंच या चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याचे बोललं जात आहे. नुकतंच ईशाने इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये याबद्दल स्पष्ट मत मांडलं.
आणखी वाचा : “मला ती आवडली, पण ओंकारला…” ‘सरला एक कोटी’च्या रोमँटिक सीनबद्दल ईशाचा बॉयफ्रेंड स्पष्टच बोलला

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

ईशा केसकर काय म्हणाली?

सध्या राज्यात अनेक ठिकाणी चित्रपटाला स्क्रिन्स मिळत नाही. आम्ही चित्रपट प्रदर्शनाची घाई केली. त्यामुळे अनेक ठिकाणी शो कमी आहेत. जो वेळ आम्हाला मिळाला त्यावेळेत आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू असे वाटलं होतं. पण तसं झालं नाही.

शेवटी एका हाताने टाळी वाजत नाही. आम्हालाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात उशीर झाला. आम्ही प्रेक्षकापर्यंत तेवढे पोहोचू शकलो नाही. त्यांना तितकंस पटवून देऊ शकलो नाही. ‘वेड’ या मराठी चित्रपटासाठी ज्या प्रकारे प्रमोशन करण्यात आलं, तितकं आम्हाला करता आलं नाही. त्यात आम्ही मागे पडलो आणि म्हणून आम्हाला स्क्रीन दिल्या गेलेल्या नाही.

पण प्रेक्षकांना जर चित्रपटाला प्रतिसाद देत असतील तर अजून स्क्रीन मिळाव्यात यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन. विविध शहरात हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, याला दोन तरी शो मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करु. आमच्या चित्रपटाबरोबर अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे स्पर्धा खूप आहे. तरीही आमचे निर्माते आणि दिग्दर्शक खूप प्रयत्न करत आहेत, असे ईशा केसकरने म्हटले.

आणखी वाचा : “आम्ही एकमेकांचे हात धरले अन्…” ओंकार भोजनेबरोबरच्या ‘त्या’ रोमँटिक सीनबद्दल ईशा केसकर स्पष्टच बोलली

दरम्यान “सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे. तर विनोद नाईक कार्यकारी निर्माते आहेत. त्याबरोबर सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट गेल्या २० जानेवारी २०२३ ला प्रदर्शित झाला.