कलाविश्वातील लोकप्रिय रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख ही जोडी ‘वेड’ या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. याचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहत्यांनी चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

‘वेड’ चित्रपटातील गाण्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रितेश-जिनिलियाच्या या चित्रपटातील ‘सुख कळले’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणे हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. एवढंच काय बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगणलाही या गाण्याने भूरळ पाडली आहे.

हेही वाचा>>महेश मांजरेकरांनी माझं नाव बदललं”, राखी सावंतचा खुलासा; जाणून घ्या तिचं खरं नाव

हेही पाहा>>Photos: ‘गांधी गोडसे: एक युद्ध’मध्ये महात्मा गांधींची भूमिका साकारणारा अभिनेता कोण?

काजोलने सुख कळले गाण्याचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “निस्वार्थ प्रेमापेक्षा मोठं वेड काय असू शकतं?”, असं कॅप्शन तिने व्हिडीओला दिलं आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>>तुनिषा शर्माबाबत पोलिसांनी विचारल्यावर शीझान खानला कोसळलं रडू; नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश व जिनिलिया मुख्य भूमिकेत असलेला ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून जिनिलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना वेड लावणार का, हे पाहावं लागेल.