‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे शेवटचे दोन आठवडे शिल्लक आहेत. खेळात टिकून राहण्यासाठी घरातील सदस्यांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे खेळ अधिकच रंजक होत चालला आहे. काही आठवड्यांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंतने एन्ट्री घेतली होती.

राखीने एन्ट्री घेतल्यापासूनच घरात ती काही ना काही करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतााना दिसली. आताही राखी प्रेक्षकांसह घरातील सदस्यांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसते. सामान्य घरात जन्मलेल्या राखीने स्वत:च्या कर्तृत्वावर बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली. अनेक आयटम सॉंग आणि चित्रपटांत काम करुन राखीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

हेही वाचा>> Salman Khan Birthday: १०० कोटींचा बंगला, ८० कोटींचं फार्म हाऊस अन्…; सलमान खानची एकूण संपत्ती माहिती आहे का?

राखी या नावाचे लाखो दिवाने आहेत. परंतु, हे तिचं खरं नाव नाही. नुकत्याच ‘बिग बॉस मराठी’च्या भागात खुद्द राखीनेच याचा खुलासा केला आहे. ‘राखी’ हे नाव महेश मांजरेकर सरांनी दिलं असल्याचं राखी म्हणाली. “करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मांजरेकर सरांनी मला नाव बदलून ‘राही’ व ‘राखी’ यापैकी एक ठेवण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी ‘राखी’ हे नाव निवडलं”, असं ती म्हणाली.

हेही पाहा>> Photos: मेकअप रुम ते मालिकेचा सेट; शीझान खानने शेअर केलेले तुनिषा शर्माबरोबरचे ‘ते’ फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी क्षेत्रात आल्यानंतर त्यांची नावे बदलली आहेत. म्हणूनच राखीनेही स्वत:चं नाव बदललं. राखीचं खरं नाव ‘नीरू भेडा’ असं आहे. ‘बिग बॉसच्या मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या ट्रॉफीसाठी राखी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे.