scorecardresearch

Premium

“माय डार्लिंग, तू माझ्यासाठी…,” निवेदिता सराफ यांनी अशोक मामांसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा काल ७६ वा वाढदिवस झाला.

ashok saraf and nivedita

मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा काल ७६ वा वाढदिवस झाला. गेली अनेक वर्षं ते त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आले आहेत. सर्व कलाकारांचं त्यांच्याशी खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. सोशल मीडियावरून त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत होता. अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशातच त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनीही त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली.

अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांची लव्हस्टोरी नेहमीच चर्चेत असते. त्यांनी आणि अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. अनेकदा ते एकमेकांबद्दल वाटणारा प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात. तर काल रात्री निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट लिहिली.

maharashtrachi hasyajatra fame nikhil bane and gaurav more
“अजिबात टेन्शन नको घेऊस”, ‘हास्यजत्रा’ फेम निखिल बनेला ‘बॉईज ४’च्या सेटवर गौरव मोरेनं केली ‘अशी’ मदत
mrinal kulkarni virajas and shivani
“शिवानी आणि विराजस, तुम्ही दोघेही…,” मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केला आनंद, जाणून घ्या खास कारण
Savaniee-Ravindrra
लता मंगेशकरांच्या जयंतीनिमित्त गायिका सावनी रविंद्रने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली…
aleel Kulkarni shared a special post on the occasion of Lata Mangeshkars birthday
“तुम्ही आहातच इथे…” लतादीदींसाठी सलील कुलकर्णी यांची खास पोस्ट; जुना फोटो शेअर करत म्हणाले…

हेही वाचा : Ashok Saraf birthday: ‘अशी’ झाली अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणण्याची सुरुवात, जाणून घ्या मजेशीर किस्सा

त्यांनी त्यांचा आणि अशोक सराफ यांचा एक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “हॅपी बर्थडे माय डार्लिंग… मी खूप भाग्यवान आहे की तू माझा जोडीदार आहेस. तू माझा मित्र आहेस, माझा मार्गदर्शक आहेस, तू सगळं काही आहेस. लव्ह यू.” आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

आणखी वाचा : “अशोक मामांसारख्या महानायकाबरोबर काम करणं म्हणजे…” रितेश देशमुखने सांगितला अनुभव

निवेदिता सराफ यांच्या या पोस्टवर अशोक व निवेदिता सराफ यांचे चाहते आणि त्याचबरोबर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी कमेंट्स करत अशोकमामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress nivedita saraf shared a special post for ashok saraf on his birthday rnv

First published on: 05-06-2023 at 13:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×