मराठी मनोरंजन सृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत, जे इतर क्षेत्रातही आपलं नशीब आजमावत आहे. गेल्या काही दिवसांपासून बरेच कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवताना दिसत आहेत. अभिनेत्री पल्लवी सुभाष देखील एका वेगळ्या क्षेत्रात रमली आहे.

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने पल्लवीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पण हा लोकप्रिय चेहरा कालांतराने हळूहळू दिसेनास झाला. २०१४ला प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटात पल्लवी शेवटची दिसली. त्यानंतर पल्लवी फारशी दिसली नाही. पण आता ती सध्या काय करते? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: मधुरा वेलणकरची बहीण झळकणार ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका

अभिनेत्री पल्लवी सुभाषने नुकताच ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. तेव्हा तिने ती सध्या काय करते? याचा खुलासा केला. पल्लवी म्हणाली, “मी अनेक वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात काम करत आहे. बऱ्याच जाहिरातींचं काम सध्या सुरू आहे. मी जाहिरातींच्या चित्रीकरणात रमली असून आजवर मी मराठी, हिंदी, दाक्षिणात्य भाषांमध्ये जाहिराती केल्या आहेत. हे माझं आवडतं क्षेत्र आहे. याशिवाय हिंदी मालिकांच्या लूक टेस्टही सुरू आहेत. गेल्या वर्षी चित्रीकरण केलेला चित्रपट यंदा प्रदर्शित होईल. तसेच अनेक चित्रपटासाठी विचारणा होत असून सध्या संहितावाचनाचं काम सुरू आहे.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आरोहीचा खऱ्या आयुष्यातील होणारा नवरा काय करतो काम? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे पल्लवी म्हणाली, “आजवर मी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मी जे-जे काम केलंय त्याबद्दल मी समाधानी असून मला आव्हानात्मक भूमिका करायला आवडतं. भविष्यात मला चरित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.”