‘क्षणभर विश्रांती’, ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘निळकंठ मास्तर’ यांसारख्या चित्रपटातून पूजा सावंतनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिनं मराठीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा हा लोकप्रिय अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना बिल्डिंगमधून हाकलून देण्याची एकेदिवशी ताकीद मिळाली होती. का ते जाणून घ्या?

हेही वाचा – “याची जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर…” प्रियदर्शनीनं शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर ओंकार राऊतची प्रतिक्रिया

अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ व फोटो चर्चेचा विषय असतात. सोशल मीडियावरील बऱ्याच व्हिडीओ, फोटोमध्ये आपण तिला मांजर, कुत्री, पक्षी यांची काळजी घेताना पाहिलं आहे. पूजा ही एक प्राणीप्रेमी आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिला प्राण्यांचा डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण ‘श्रावण क्विन’चा पुरस्कार मिळाल्यानंतर तिचा हा निर्णय बदलला आणि ती अभिनय क्षेत्राकडे वळाली. नुकतीच पूजा अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळेस तिनं कुटुंबीयांबरोबर घडलेला एक किस्सा सांगितला.

हेही वाचा – “…त्या दिवशी माझा सगळा माज उतरला”; स्पृहा जोशीनं सांगितला अनुभव, म्हणाली…

पूजा म्हणाली की, “आमच्या जुन्या कॉलनीमध्ये आमच्यासाठी एक ताकीद दिलेली नोटीस लावली होती; ज्यामध्ये आमची नाव होती. जर कुत्र्यांना खायला घातलं तर या बिल्डिंगमधून हाकलून देण्यात येईल, अशी ताकीद त्या नोटीसवर लिहिली होती. आम्ही तेव्हा दुसऱ्या मजल्यावर राहत होतो आणि ती नोटीस पहिल्या मजल्यावर लावण्यात आली होती. ती नोटीस पाहताच रुचिरानं (बहीण) तो कागद फाडून टाकला.”

हेही वाचा – पूजा सावंतला लग्नासाठी हवाय ‘असा’ मुलगा? फक्त ‘या’ दोनच अपेक्षा; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी तिच्या ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता पुष्कर जोग, पुष्करराज चिरपुटकर, दिशा परदेशी झळकणार आहेत.