अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘पवित्रा रिश्ता’ या हिंदी मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झाली. छोट्या पडद्यावर यश मिळावल्यावर अभिनेत्रीने ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. वैयक्तिक आयुष्यात प्रार्थनाने २०१७ मध्ये दिग्दर्शक-निर्माता अभिषेक जावकरशी लग्न केलं. याची जोडी मराठी कलाविश्वात चांगलीच लोकप्रिय आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतीच अभिनेत्रीने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये प्रार्थनाने अभिषेक बरोबरचे Unseen रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देत प्रार्थना लिहिते, “मेरी तरफ आता हर ग़म फिसल जाए, आँखों मे तुम को भरूं, बिन बोले बातें तुमसे करूँ…अगर तुम साथ हो…अभिषेक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”

हेही वाचा : सून हवी तर अशी! शिवानी रांगोळेने नेसली सासूबाई मृणाल कुलकर्णींची साडी, नवऱ्याचा उल्लेख करत म्हणाली…

प्रार्थनाने पुढे, “Happy Birthday नवरोबा…आय लव्ह यू” असं देखील म्हटलं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर स्वप्नील जोशी, मयुरी देशमुख या कलाकारांसह नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : फिल्मफेअर सोहळा गुजरातला गेल्याने जितेंद्र आव्हाडांचा संताप; अक्षय कुमारचं नाव घेत म्हणाले, “मराठी मातीचा उपयोग फक्त…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रार्थना बेहेरेने लग्न झाल्यावर काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर २०२२ मध्ये ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याशिवाय प्रार्थना लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना तगड्या मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळेल.