‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने ३७ हून अधिक कोटींची कमाई केली. हा चित्रपट तयार करताना केदार शिंदे यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. यामध्ये त्यांना त्यांच्या पत्नीची आणि लेकीची भक्कम साथ मिळाली. तर आता केदार शिंदेनी त्या दोघींबद्दल शेअर केलेल्या एका खास पोस्टला सना शिंदेने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटाशी संबंधित कलाकारांबद्दल, चित्रपटाच्या टीमबद्दल पोस्ट शेअर करत त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. आज केदार शिंदे यांनी त्यांची पत्नी बेला शिंदे आणि लेक सना शिंदे या दोघींबद्दल एक पोस्ट शेअर केली. हा चित्रपट तयार करत असताना ज्या कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं त्या प्रत्येक वेळी त्यांना बेला आणि सनाची भक्कम साथ लागली. तर या चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून सनाने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असं केदार शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं.
केदार शिंदे यांनी केलेल्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं. त्यांच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत या चित्रपटाचं आणि त्यांचं कौतुक केलं. तर त्यांची मुलगी सना शिंदे ही नही या पोस्टवर खास प्रतिक्रिया दिली. केदार शिंदे यांची ही पोस्ट तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, “माय लाईफलाईन… श्री स्वामी समर्थ.” सना शिंदे हिने दिलेली ही प्रतिक्रिया सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच सुमारास सना अमेरिकेला गेली. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या अमेरिकेच्या ट्रीपचे फोटोच्या त्यांची शेअर करत आहे. चित्रपटाला सर्वत्र मिळणारा प्रतिसाद पाहून ती भारावून गेली आहे.