मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्नेहल तरडेने नाटक, मालिका व चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनेत, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या त्या पत्नी आहेत. कलाविश्वातील ही जोडी कायमच चर्चेत असते.

सध्या स्नेहल तरडे तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. गावाशी नाळ जोडलेली राहावी म्हणून स्नेहलने फ्लॅटमध्येच मातीपासून स्वत:च्या हाताने चूल बनवली आहे. चूल बनवतानाचा हा व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला “फ्लॅट संस्कृतीत जगत असताना गावाकडची चूल आणि शेणाने सारवलेला ओटा, त्यावर स्वयंपाक करताना येणारा ठराविक वास यांच्याशी असलेला बंध हळूहळू कमी होऊ शकतो. तो कमी होऊ नये म्हणून आपल्या घरी एक चूल आणि ओटा असावा हे माझं अनेक वर्षांचं स्वप्न आज मी पूर्ण केलं”, असं कॅप्शन तिने दिलं आहे.

हेही वाचा >> ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक, शूटिंगदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हेही वाचा >> “खूप सारं प्रेम आणि…”, समांथाच्या आजाराबद्दल समजताच नागा चैतन्याच्या भावाने केलेली कमेंट चर्चेत

स्नेहलच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रवीण तरडेंनीही स्नेहलच्या पोस्टवर कमेंट करत पत्नीची प्रशंसा केली आहे. “वा वा वा…ही माझी अन्नपूर्णा”, अशी कमेंट त्यांनी केली आहे. कलाविश्वात सक्रिय असले तरीही तरडे कुटुंबाची गावाच्या मातीशी असलेली नाळ अजूनही जोडलेली आहे. गावाकडे शेती करत असल्याचंही प्रवीण तरडेंनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीत सांगितलं आहे.

हेही वाचा >> “माणूस निघून गेला की समजतं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, शेअर केली भावूक पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवीण तरडे व स्नेहल तरडे २ डिसेंबर २००९ साली विवाहबंधनात अडकले. त्यांना एक मुलगाही आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटांत स्नेहल महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती.