मराठी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने नवीन रेकॉर्ड निर्माण केले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुकन्या मोने यांनी साकारलेली भूमिका खूप गाजत आहे. अशातच सुकन्या मोनेंची एक मुलाखत चांगलीच गाजत आहे. या मुलाखतीत सुकन्या मोने यांनी त्यांच्या क्रशबद्दल खुलासा केला आहे.
हेही वाचा- ‘बाईपण भारी देवा’ने मोडला रितेश देशमुखच्या ‘वेड’चा रेकॉर्ड; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
एका मुलाखतीत सुकन्या मोने यांना त्यांच्या क्रशबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी बॉलीवूड अभिनेता अनिल कूपर याचं नाव घेतलं. सुकुन्या म्हणाल्या “अनिल कपूर माझं पहिल क्रश होता. सुकुन्या म्हणाल्या माझा पहिला चित्रपट ‘ईश्वर’. कॅमेऱ्यासमोर जाण्याची माझी पहिलीच वेळ. या चित्रपटात मी अनिल कपूरबरोबर काम केलं होतं. आणि नेहमीचा एक क्रश आहे तो म्हणजे अमिताभ बच्चन.”
सुकन्या यांनी अनिल कपूरचं नाव घेताच अभिनेत्री सुचित्रा बांदेकरनेही माझाही क्रश तोच आहे असं सांगितलं. तर अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांचं आपलं क्रश असल्याचे सांगितलं.
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्त्रीयांवर आधारीत या चित्रपटाचे पुरुष वर्गातूनही कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल सुरू आहेत. पहिल्या तीन दिवसात ६.४५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने एकूण १३.५० कोटींची कमाई केली आहे. तर अजूनही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.