अभिनेते आदेश बांदेकर वेब अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरही आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरंजन सृष्टीत उत्तम काम करत आहे. अभिनय करण्याबरोबरच तो त्यांच्या ‘सोहम प्रोडक्शन्स’ची जबाबदारी ही सांभाळतो. आता आपल्या लेकाच्या कामाबद्दल सुचित्रा बांदेकर यांनी भाष्य केलं आहे.

‘सोहम प्रोडक्शन्स’ची ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या सुरू आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या मालिकेच्या प्रोडक्शनची धुरा सोहम सांभाळत आहे.

आणखी वाचा : “चित्रपटात सोहमबरोबर दिसणारी अभिनेत्री त्याची…”, अखेर केदार शिंदेंनी केला सुचित्रा-आदेश बांदेकरांच्या लेकाबद्दल खुलासा

सोहमबद्दल बोलताना सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “फक्त माझा मुलगा आहे म्हणून मी हे म्हणत नाही पण सोहम खरोखरच हुशार आहे. तो चांगलं वाचतो, जगभरातील उत्तमोत्तम कलाकृती पाहतो. त्याची मतं तो उत्तमप्रकारे मांडू शकतो. आमच्या निर्मिती संस्थेत तरुणाईचं नेतृत्व करणारा त्याचा दृष्टिकोन नेहमीच महत्वाचा ठरतो. तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याच्या बाबतीत हे मला सोहमची खूप मदत होते. मालिकेचे संवादही मला फोनवर वाचणं खूप जड जातं. एक कॉपी मला कागदावर वाचायला द्या, असं माझं नेहमी म्हणणं असतं.”

हेही वाचा : केसांना लाल रंगाचे हायलाईट अन्…; सुचित्रा बांदेकरांच्या नवीन लूकवर लेकाने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोहम नुकताच ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला. या चित्रपटात तो त्याची आई सुचित्रा बांदेकर यांच्याबरोबरच स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. या चित्रपटाचं खूप कौतुक होत असून आतापर्यंत या चित्रपटाने ७० हून अधिक कोटींची कमाई केली आहे.