राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाची हवा आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला आहे. या प्रीमियरला अनेक मराठीतले कलाकार उपस्थित होते. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक हा चित्रपट बघून भारावून गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटाबद्दल माध्यमांशी बोलताना तो असं म्हणाला की “कुठला ही चित्रपट हा अनुभव देणारा हवा, चित्रपटाचा उत्तम अनुभव गोदावरी पाहताना येतो. चित्रपट पाहताना व्यक्तिरेखेशी तुम्ही कनेक्ट करत असाल तर हे चित्रपट बनवणाऱ्या व्यक्तीच श्रेय आहे. गोदावरी बघताना व्यक्तिरेखेशी, त्यांच्या भावनांशी स्वतःला कनेक्ट करत होतो.” अशाच शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रसाद ओक नुकताच ‘धर्मवीर’ चित्रपटात दिसला होता तसेच ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते.

Movie Review : नदी आणि मानवी नातेसंबंध यांची उत्तम गुंफण बांधणारा ‘गोदावरी’

येत्या ११ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात विक्रम गोखले. संजय मोने, नीना कुलकर्णी असे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. नुकतंच या चित्रपटातील ‘खळ खळ गोदा’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.

निखिल महाजन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे त्यांनी याआधी ‘जून’, ‘बाजी’ ‘पुणे ५२’ अशा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा ए.व्ही.प्रफुल्लचंद्रा यांच्या खांद्यावर आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After watching marathi film godvari prasad oak get emotional and give his reaction spg
First published on: 09-11-2022 at 19:01 IST