रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रितेशने या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. तर जिनिलीयाने ‘वेड’ मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला आहे. मराठीतले दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांनी पत्नी सुप्रिया पिळगावकर बरोबर हा चित्रपट पाहीला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना या चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रितेश देशमुखचं कौतुक केलं आहे, ते असं म्हणाले, “त्याला पहिल्यापासून काहीतरी चांगले करण्याचे वेड आहे. ते वेड या पद्धतीने तुमच्यासमोर आले आहे. त्यांनी पहिल्यांदा दिग्दर्शन केले आहे मात्र चित्रपट बघून असे वाटत नाही.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Ved Movie Review: अनोख्या प्रेमकहाणीला ॲक्शनची जोड, स्वतःचं वेगळेपण जपणारा ‘वेड’

चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अशोक सराफ रितेशने साकारलेल्या पात्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटात विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर आदी कलाकार दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान वेड या मराठी चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख हा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर आता रितेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही तब्बल १० वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे