मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय व हजारो मुलींचा क्रश असलेला आकाश ठोसर सध्या चर्चेत आहे. ‘सैराट’ चित्रपटातून पदार्पण केलेल्या आकाशला पहिल्याच चित्रपटाने लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. या चित्रपटात त्याने साकारलेली परश्या ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.

आकाश सध्या कामातून ब्रेक गावी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. गावी तो शेतीच्या कामात रमला आहे. आकाशने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आकाश शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. या व्हिडीओला त्याने नाद असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> Video : अमेरिकेच्या रस्त्यावर मराठी अभिनेत्याचा आईसह ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

“आर्चीचा ट्रॅक्टर कधी चोरला?” अशी कमेंट एकाने केली आहे. तर अनेकांनी आकाशचं कौतुक केलं आहे. “आमचा लाडका शेतकरी” असं एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “मातीमधून वर आलेल्या माणसाला मातीची किंमत असते,” अशी कमेंट केली आहे. तर काहींनी आकाशला “शेतकरी पुत्र” म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
akash-thosar-video

‘सैराट’ मधून प्रसिद्धी मिळवलेल्या आकाशने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘झुंड’, ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या चित्रपटांमध्ये तो दिसला होता. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘घर बंदूक बिरयानी’ या नागराज मंजुळेंच्या चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती.