खासदार आणि अभिनेते डॉ.अमोल कोल्हे हे त्यांच्या अभिनयामुळे आणि राजकीय भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अमोल कोल्हे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे कामाबाबत तसेच खासगी आयुष्याबाबत विविध पोस्ट शेअर करत असतात. देशभरात आज ईद साजरी केली जात आहे. ईद आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आली आहे. अमोल कोल्हे यांनी हटक्या शब्दात रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा- ‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची नवी इनिंग! व्यवसाय क्षेत्रात केलं पदार्पण; म्हणाली, “गेली ३ वर्षं…”

ईदनिमित्त देशभऱातील मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक राजकीय नेते मुस्लिम बाधवांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही हटक्या पद्धतीने ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमोल केल्हे यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे की, ईदच्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak असं लिहिलं.. “I” लई Important… नाहीतर राजकारणात असलेल्यांना आयची आय आठवेल! E”i”d Mubarak!” अशी पोस्ट खासदार कोल्हे यांनी केली आहे. कोल्हेंच्या या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
देशात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर ईडीवरुन टीका केली जात आहे. सरकार ईडी यंत्रणेचा गैरवापर करुन विरोधकांना झुकवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांतील अनेक नेत्यांनी ईडीला सरकारच्या हातातील खेळणे असल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टनंतर अमोल यांना काही जणांनी अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. मराठी सण असूनही ईदच्या शुभेच्छा कशासाठीही असा प्रश्न काही नेटकरऱ्यांनी विचारला आहे. दरम्यान अमोल कोल्हे यांनी अक्षयतृतीयेच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमोल कोल्हे यांच कौतुक केलं होतं. त्यावरुन अमोल कोल्हे यांना भाजापाकडून ऑफर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अमोल कोल्हेंनी याबाबत स्पष्टीकरणही दिले होते. नरेंद्र मोदींनी माझे कौतुक केले म्हणून मी त्यांच्याकडे जावे असे नाही, असे कोल्हे म्हणाले होते.