अमृता खानविलकरने २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झी सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमातून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं. यानंतर प्रेक्षकांच्या लाडक्या चंद्रमुखीने २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोलमाल’ चित्रपटातून मराठी कलाविश्वात पाऊल ठेवलं. या संपूर्ण प्रवासात अमृताच्या आई-बाबांप्रमाणेच एक व्यक्ती कायम तिच्या बरोबर होती आणि ती म्हणजे तिचा नवरा हिमांशू मल्होत्रा. हिमांशू आणि अमृताने जवळपास १० ते १२ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१५ मध्ये लग्न केलं. ही जोडी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. आज अमृताच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या नवऱ्याने खास पोस्ट शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता खानविलकरचा वाढदिवस २३ नोव्हेंबरला साजरा केला जातो. परंतु, गेली अनेक वर्ष हिमांशू तिचा वाढदिवस संपूर्ण नोव्हेंबर महिनाभर साजरा करतोय. हिमांशू लाडक्या बायकोला १ ते २३ नोव्हेंबरपर्यंत रोज २३ गिफ्ट्स देतो. असा खुलासा अमृताने ‘नच बलिए’च्या रंगमंचावर केला होता. पण याउलट हिमांशूचा वाढदिवस २ एप्रिलला असल्याने अमृता त्याला फक्त दोनच गिफ्ट्स देते. असंही तिने सांगितलं होतं.

हेही वाचा : शुबमन गिलबरोबरचा डीपफेक फोटो, बनावट अकाऊंटमुळे सारा तेंडुलकर संतापली! पोस्ट करत म्हणाली, “अशा फसवणुकीमुळे…”

आज बायकोच्या वाढदिवसानिमित्त हिमांशूने खास पोस्ट शेअर केली आहे. यात तो लिहितो, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! अमू तू माझ्या आयुष्यात कायम महत्त्वाची आहेस आणि राहशील. शेवटपर्यंत मी तुझ्याबरोबर आहे.” नवऱ्याच्या पोस्टवर अमृता म्हणते, “खूप खूप थँक्यू… गेली २० वर्ष आपण एकत्र वाढदिवस साजरा करत आहोत.”

हेही वाचा : Video : इंदू डार्लिंगचा वाढदिवस ते सात बायकांचं रियुनियन, ‘असा’ घडला ‘झिम्मा २’! चित्रपटाच्या शूटिंगचे न ऐकलेले किस्से…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमृता-हिमांशूने ‘नच बलिए’च्या सातव्या पर्वात एकत्र सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचं विजेतेपद या दोघांनी आपल्या नावे केलं होतं. अमृताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला तिच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात यश मिळालं. आता लवकरच ती ‘कलावती’ आणि ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.