मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या स्टाइल व स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. ती अनेक टॉक शोमध्ये हजेरी लावते आणि तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मोकळेपणाने देत असते. अमृताने ‘पटलं तर घ्या’ या नव्या शोमध्ये हजेरी लावली, यावेळी तिने तिच्या पतीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दोघांमध्ये सर्व आलबेल आहे की नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

“तू ज्या वेदनेत…” आदिल खानची कोठडीत रवानगी होताच राखी सावंतच्या पहिल्या पतीचं मोठं वक्तव्य

प्लॅनेट मराठी ओटीटी या एकमेव मराठी ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एक चॅट शो सुरू करण्यात आला आहे. त्यात मराठी कलाकारांशी गप्पा मारल्या जातात. या नव्या चॅट शोचे नाव ‘पटलं तर घ्या with Jayanti’ असं आहे. हा शो जानेवारीमध्ये सुरू झाला. या शोमध्ये अमृता खानविलकरने हजेरी लावली. यावेळी तिच्याबरोबर ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत देखील होता. या भागाचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

रवीना टंडनने अक्षय कुमारशी मोडलेल्या साखरपुड्याबद्दल तब्बल २२ वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “त्याच्या आयुष्यातून…”

प्रोमोमध्ये ओम व अमृता यांनी आपण बर्गर बडीज असल्याचं सांगितलं. तसेच माझ्या वडिलांनी मला आजपर्यंत कधीच डान्स करताना पाहिलेलं नाही, असं अमृता सांगते. तू तुझ्या नवऱ्याला अनेकदा सोशल मीडियावर ब्लॉक करून टाकतेस, अनफॉलो करतेस हे खरं आहे का? असा प्रश्न अमृताला विचारण्यात आला. त्यावर तिने ‘आता त्याने मला अनफॉलो केलंय’, असं उत्तर दिलं.

View this post on Instagram

A post shared by Jayanti Waghdhare (@jayantiwaghdhare)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिमांशूचं अमृताबरोबर भांडण झालंय की त्याने नेमकं तिला का अनफॉलो केलं, याबद्दल तिने सांगितलं नाही. दरम्यान, अमृताच्या पतीचं नाव हिमांशू मल्होत्रा आहे. या दोघांनी २०१५ मध्ये लग्न केलं होतं. तर या दोघांची पहिली भेट २००४ साली झाली होती.