मराठी कलाविश्वात अनेक अभिनेत्री एकमेकींच्या फार जवळच्या मैत्रिणी आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सोनाली खरे या दोघीही कायम एकत्र असतात. या दोन अभिनेत्री लाडक्या मैत्रिणी असल्यामुळे सोनालीची लेक अमृताला मावशी म्हणते. सोनालीच्या लेकीच्या वाढदिवसनिमित्त अमृता खानविलकरने खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : Video : आलिया-रणवीरच्या ‘व्हॉट झुमका’गाण्यावर मराठमोळ्या अभिनेत्रींनी केला डान्स, नेटकरी म्हणाले, “मालिकेतील सासू-सुनेचा…”

सोनाली खरेच्या मुलीचं नाव सनाया आहे. अमृताने सनायाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ती लहानपणापासून अमृताला मावशी म्हणते, त्यामुळे दोघींमध्ये फार चांगलं नातं असल्याचं दिसून येतं. या व्हिडीओत अमृताने सनायाच्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या सर्व फोटोंना एकत्र केल्याचे दिसते.

हेही वाचा : “नवाजुद्दिनचा अभिनय पाहून सेटवरचे लोक रडले अन् इरफान खान…”, ‘न्यूयॉर्क’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

अमृता खानविलकर सनायासाठी लिहिते, “मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही…तू माझ्यासाठी खूप खास आहेस. आमचं गोंडस बाळ ते आता एक हुशार मुलगी हा तुझा प्रवास पाहून खूप छान वाटतं. कायम आनंदी राहा माझ्या बाळा…तुझ्या आजूबाजूला अशी खूप लोकं आहेत जी तुझ्यावर खूप प्रेम करतात हे कायम लक्षात ठेव…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय बेबी…देवाचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठिशी आहेत.”

हेही वाचा : Video : ‘बाईपण भारी देवा’ सुपरहिट ठरल्यानंतर अमृता खानविलकरने सुकन्या मोनेंना पाठवली भेटवस्तू, म्हणाल्या “तुझ्या तायडेला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमृताने शेअर केलेल्या पोस्टवर सनायाने अमु मावशी…माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या व्हिडीओवर कमेंट करत अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांनीही सनायाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.