गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक उघडल्यावर ‘बहरला हा मधुमास’ हे एकच गाणं कानावर पडत आहे. या गाण्याची अनेक कलाकारांना, इन्स्टाग्राम रिल स्टार्सला तसेच सर्वसामान्यांना भूरळ पडली आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील हे गाणं आहे. नुकतंच या गाण्यावर प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला आणि त्याची बहिण निमा पॉलने रिल केले आहे. त्यावर आता अभिनेता अंकुश चौधरीने प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची सातत्याने चर्चा सुरु आहे. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. आजोबांच्या म्हणजेच शाहीर साबळे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचा नातू केदार शिंदे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ सध्या ट्रेंड होत आहे.
आणखी वाचा : Video : किली पॉलच्या बहिणीला पडली मराठी गाण्याची भूरळ, ‘बहरला हा मधुमास’वर रील शेअर करत म्हणाला…

नुकतंच किली पॉल आणि त्याची बहीण निमा हिने या गाण्यावर रील व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत किली पॉल आणि त्याची बहिण हुबेहुब हुकस्टेप करत आहेत. निमा पॉल हिने अभिनेत्री सना शिंदे हिच्याप्रमाणे गाण्यातील हुकस्टेप कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे ती या गाण्याचे लिपसिंकही करताना दिसत आहे.

त्यांचा हा व्हिडीओ पाहून अभिनेता अंकुश चौधरीने त्यांचे कौतुक केले आहे. अंकुशने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने त्यांचे कौतुक केले आहे. “मला गाणे आणि डान्स दोन्हीही फार आवडले.” असे त्याने हे रील करताना म्हटले आहे. विशेष म्हणजे अंकुश चौधरीने हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही यावर कमेंट केली आहे. तेजस्विनीने या व्हिडीओवर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट करत ‘जय महाराष्ट्र’ म्हटलं आहे.

आणखी वाचा: “मी बायोपिकसाठी खूप वाट पाहिली”, अंकुश चौधरीचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “प्रत्येक वेळी सुबोधच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं गुरू ठाकूर यांनी लिहिलं आहे. अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे तर प्रसिद्ध बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे.