अभिनेता आरोह वेलणकरने ‘रेगे’ चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेची इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली. यानंतर ‘बिग बॉस’ मराठी कार्यक्रमात सहभागी झाल्याने आरोह घराघरांत लोकप्रिय झाला. चित्रपट, रंगभूमी, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने काम केलेलं आहे. अभिनयाप्रमाणेच तो सामाजिक क्षेत्रात सक्रिय असतो याशिवाय अनेक राजकीय मुद्द्यांवर तो भाष्य करत असतो. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेकदा भाजपाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. सध्या आरोहची अशीच एक एक्स (ट्विटर) पोस्ट चर्चेत आली आहे.

“सुप्रभात! ९ वर्षांपूर्वी केलेल्या भाजपच्या जाहिरातीवरून एवढी मळमळ होतीये चमच्यांना, काल राममंदिरावर केलेला अख्खा व्हिडिओ येईल तेव्हा काय होईल? चमच्यांनो तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला शक्य नाही रे काही. तुम्ही, तुमच्या बॉसनी संन्यास घ्या आता. घरी बसा. हो मीच आहे, आणि यावेळेस पण भाजप आणि मोदीजींनाच सपोर्ट करणार! काय पी पाटील समजलं का? माझ्या जॉब आणि पैशांचं सोड तुला जॉब हवा असेल तर सांग पगारावर घेऊ शकतो, मागच्या ९ वर्षात मोदीजींमुळे छान झालं सगळं….बोल किती देऊ पगार तुला?” अशी एक्स पोस्ट आरोहने केली आहे.

हेही वाचा : Video : पूजा सावंतची Bride To Be पार्टी! प्रार्थना-भूषणसह गोव्यात ‘अशी’ केली धमाल, पाहा व्हिडीओ

नेमकं काय घडलं?

आरोहने वेलणकरने ९ वर्षांपूर्वी भाजपा पक्षाकडून एक जाहिरात केली होती. अभिनेत्याने ही नोकरी संदर्भात केलेली जाहिरात प्रतिक पाटील या युजरने एक्सवर (ट्विटर) शेअर करत अभिनेत्यावर टीका केली होती. या पोस्टला रिशेअर करत आरोहने संबंधित युजरला प्रत्युत्तर दिलं आहे. आरोहच्या या प्रत्युत्तरांनंतर प्रतिक पाटील आणि त्याच्यामध्ये सध्या एक्स वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

aroh
आरोह वेलणकर

हेही वाचा : “व्याजाचा हप्ता…”, ‘असा’ आहे कुशल बद्रिकेचा नव्या वर्षाचा संकल्प; पोस्ट वाचून नेटकरी म्हणाले, “दादा जमलं तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्याच्या एक्सवर (ट्विटर) नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट्समध्ये काही युजर्सनी अभिनेत्याचं समर्थन केलं असून काहींनी आरोहला ट्रोल केलं आहे. याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर मराठीत काम केल्यावर आता आरोह लवकरच एका हिंदी चित्रपट महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तो अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसेल.